Maharashtra Bandh : जळगावात तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 12:51 PM2018-08-09T12:51:02+5:302018-08-09T12:56:37+5:30

एसटी बसेस् थांबलेल्याच

Maharashtra Bandh: A resounding response to the youth's suicide attempt in Jalgaon district | Maharashtra Bandh : जळगावात तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

Maharashtra Bandh : जळगावात तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next
ठळक मुद्देठिकठिकाणी रास्ता रोकोप्रवाशांचे हाल

जळगाव : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्याल़यासमोर आंदोलन सुरू असताना एका तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे काही वेळ गोंधळ उडाला. दरम्यान, जळगावात शहरासह जिल्ह्यात बंदला प्रतिसाद मिळत आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी क्रांती दिनाचे औचित्य साधून गुरुवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान गुरुवारी सकाळी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या वेळी एका तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्या वेळी सोबतच्या आंदोलकांनी वेळीच धाव घेत त्याला रोखले व पुढील अनर्थ टळला.
महाराष्ट्र बंदमध्ये शहरातील बाजारापेठ बंद करण्यासाठी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने महात्मा फुले मार्केट, गोलाणी मार्केट, दाणा बाजार इत्यादी ठिकाणी जावून बंदचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार दुकाने बंद करण्यात आली. अनेकांनी सकाळी दुकाने उघडलीच नव्हती. या सोबतच सराफ बाजारही बंद होता.
जिल्ह्यातही बंदला प्रतिसाद मिळत असून मुक्ताईनगर, अंतुर्ली, कुºहा काकोडा, इच्छापूर आदी ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. जळगाव आगारासह जिल्ह्यातील आगारांमधून बसेस् न सुटल्याने प्रवाशांचे हाल झाले.

Web Title: Maharashtra Bandh: A resounding response to the youth's suicide attempt in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.