शहरातील विविध शासकीय व सामाजिक संस्थांतर्फे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:11 AM2021-05-03T04:11:03+5:302021-05-03T04:11:03+5:30
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे पाणीपुरवठामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ...
जिल्हाधिकारी कार्यालय
जळगाव : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे पाणीपुरवठामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार सुरेश थोरात, सहायक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पोलीस दलाच्या पथकाने मानवंदना दिली. तर पोलीस बॅन्ड पथकाने राष्ट्रगीताची धून वाजविली.
महाराष्ट्र दिनानिमित्त शिवसेनेतर्फे अन्नदान
जळगाव : महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमीत्त शिवसेनेच्या बळीराम पेठ शाखा व आझाद क्रीडा मित्रमंडळच्या वतीने शहरातील विविध भागात राहणाऱ्या गरजू नागरिकांना अन्नदान करण्यात आले. तसेच मास्कही वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना विभाग प्रमुख विपीन पवार, रूपेश पाटील, विपीन पाटील, ललित भोळे, कुणाल चंदनकर उपस्थित होते.
कामगार दिनानिमित्त रुग्णांना किराणा वाटप
जळगाव : कामगार दिनानिमित्त रोटरी गोल्ड सिटी क्लब व मनपा क्षयरोग केंद्रातर्फे शहरातील क्षयरोग रुग्णांना एक महिन्याचा किराणा वाटप करण्यात आला. यावेळी मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी व
गोल्ड सिटी क्लबचे सदस्य डॉ. दीपक अटल यांनी कोरोना काळात क्षयरोग बांधवांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याबाबत आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक नांदेडकर यांनी केले, तर आभार कमलेश्वर आमोदेकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रशांत मोरे, दीपक गुरव, भूषण पवार यांनी परिश्रम घेतले.