महाराष्ट्र दिन साधेपणाने होणार साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:21 AM2021-04-30T04:21:29+5:302021-04-30T04:21:29+5:30
जळगाव : सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार जिल्ह्यात महाराष्ट्र दिन साधेपणाने आणि निमंत्रितांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार आहे. त्यानुसार जळगाव ...
जळगाव : सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार जिल्ह्यात महाराष्ट्र दिन साधेपणाने आणि निमंत्रितांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार आहे.
त्यानुसार जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६१ व्या वर्धापन दिन समारंभानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे १ मे रोजी सकाळी ८ वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम होणार आहे. या वेळी केवळ महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिन कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी केले आहे.