भाजपा सरकारच्या काळात महाराष्ट्र भारनियमनमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:15 AM2021-07-25T04:15:14+5:302021-07-25T04:15:14+5:30
जिल्हा दौऱ्यावर आलेले असताना चाळीसगाव तालुक्यातील युवा मोर्चा वॉरीअर्स शाखा उद्घाटन, विविध आघाड्यांचे पदाधिकारी नियुक्तीपत्र वाटप निमित्ताने चाळीसगाव येथील ...
जिल्हा दौऱ्यावर आलेले असताना चाळीसगाव तालुक्यातील युवा मोर्चा वॉरीअर्स शाखा उद्घाटन, विविध आघाड्यांचे पदाधिकारी नियुक्तीपत्र वाटप निमित्ताने चाळीसगाव येथील आमदार मंगेश चव्हाण यांच्या अंत्योदय जनसेवा कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
त्यांच्यासोबत युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष व पनवेलचे माजी उपमहापौर विक्रांत पाटील, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य तथा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपटतात्या भोळे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, पंचायत समिती गटनेते संजय भास्कर पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राठोड, मार्केटचे माजी सभापती सरदार राजपूत, ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष अनुप दादा मोरे, योगेश मैद, प्रदेश सचिव विजय बनछोडे, हर्षल विभांडीक, प्रदेश सदस्य संकेत बावनकुळे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुनील पवार, शहराध्यक्ष भावेश कोठावदे, महिला आघाडी शहराध्यक्षा संगीता गवळी, शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण उपस्थित होते.
चाळीसगाव तालुक्यातील हिंगोणे, वाघळी, पातोंडा, ओझर, टाकळी प्रचा २, चाळीसगाव शहर ३, खडकी बु., तळेगाव, रोहिणी येथे युवा मोर्चाच्या १३ शाखांचे उद्घाटन करण्यात आले.
महाराष्ट्रातील पहिली मूकबधिर आघाडी
भाजपा माजी सैनिक आघाडी, युवती आघाडीसह विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
भाजपा तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम यांच्या प्रयत्नाने राज्यातील पहिली भाजपा मूकबधिर आघाडी चाळीसगाव तालुक्यात स्थापन झाली असून तालुकाध्यक्षपदी ओझर येथील गजानन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच देशसेवा करून आता तालुक्याची सेवा करणाऱ्या माजी सैनिकांचीदेखील आघाडी भाजपने स्थापन केली असून त्यांचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील कोदगाव व कार्यकारणीच्या नियुक्त्या करण्यात आल्या. चाळीसगाव शहर युवा मोर्चानेदेखील आपल्या युवती विभाग शहराध्यक्ष नेहा दीपक पाटील व विद्यार्थी विभाग शहराध्यक्ष सिद्धांत पाटील, सोशल मीडिया विभाग शहराध्यक्ष यश सोनजे यांच्या नियुक्त्या प्रदान केल्या.