संशयाचं भूत निर्माण करायचं काम शरद पवारांना चांगलंच जमतं; खडसेंची कोपरखळी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 05:55 PM2019-10-04T17:55:01+5:302019-10-04T17:58:55+5:30
आज सामंजस्याचा 'सूर' काढणारे खडसे गेले दोन दिवस वेगळाच 'राग' आळवत होते आणि त्यावरून उलटसुलट चर्चांना जोर आला होता.
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना अखेर पक्षाने तिकीट नाकारलंच. त्यांच्याऐवजी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून आता त्यांच्या कन्या रोहिणी खडसे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. उशिरा का होईना, घरच्याच माणसाला तिकीट मिळाल्यानं आनंद झाल्याची भावना व्यक्त करत खडसेंनी बंडाचा झेंडा खाली ठेवला आहे. परंतु, आज सामंजस्याचा 'सूर' काढणारे खडसे गेले दोन दिवस वेगळाच 'राग' आळवत होते आणि त्यावरून उलटसुलट चर्चांना जोर आला होता. अशातच, खडसे, तावडेंसह अन्यही काही नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा करून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तर्कवितर्कांना हवा दिली होती. त्यावरूनच आज खडसेंनी थोडी गंमत केली.
...तर मी शिवसेनेचा प्रचारही करायला तयार- नारायण राणे
अजित 'दादां'ची सोलापुरात वेगळीच खेळी, प्रणिती शिंदेंविरुद्ध राष्ट्रवादीची बंडखोरी
तुम्ही खरंच राष्ट्रवादीच्या संपर्कात होतात का?, असं विचारलं असता, मी विरोधी पक्षात अधिक चांगलं काम केलंय, असं खडसेंनी स्मितहास्य करत सांगितलं. सत्ताधारी पक्षात संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा गोष्टी केल्या जातात. हे असं संशयाचं भूत निर्माण करायचं काम शरद पवारांना तर चांगलंच जमतं, अशी कोपरखळी त्यांनी मारली. पवार कुटुंबीयांशी आपले चांगले संबंध आहेत, पण त्याचा अर्थ त्यांच्या संपर्कात आहे असा होत नाही. त्यांची शेती, शेतीतील प्रयोग मला आवडतात, मात्र आमच्या राजकीय भूमिका भिन्न आहेत, असंही खडसेंनी स्पष्ट केलं.
अभिजीत बिचुकले वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढवणार
कोहिनूर 'नांद'ला नाही; रम्याचा राज ठाकरेंना टोला
Maharashtra Election 2019: तीन तिगाडा, काम बिगाडा... एकनाथ खडसेंचा पत्ता कट होण्याची तीन कारणं! https://t.co/rpo9a56bGg#MaharashtraElections2019
— Lokmat (@MiLOKMAT) October 4, 2019
...म्हणून रोहिणीताई नाराज!
मला तिकीट मिळावं ही कार्यकर्त्यांची इच्छा होती. मोठे प्रकल्प पूर्ण व्हावेत, यादृष्टीने एक टर्म तरी मला द्यावी, असं त्यांना वाटत होतं. पण, पक्षाने जो आदेश दिला आहे तो मान्य आहे. माझ्याऐवजी माझ्या मुलीला तिकीट मिळालंय, पण माझं तिकीट कापून तिला दिल्यानं तिला ते योग्य वाटत नाहीए, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं. जी विकासकामं मी अनुभवाच्या जोरावर करून घेऊ शकतो, ती तिला जमतील का, अशी तिच्या मनात शंका आहे. परंतु, नवी पिढी येत राहणारच, ही लोकशाहीची प्रक्रियाच आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
...अन् एकनाथ खडसे बाजूला पडत गेले!#VidhanSabha2019#MaharashtraAssemblyPolls#BJPhttps://t.co/Ijk46GArrg
— Lokmat (@MiLOKMAT) October 4, 2019
चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात ब्राह्मण महासंघही मैदानात
कणकवलीत अटीतटीची लढत! नितेश राणे पुन्हा मिळवणार का विजय?
बाळासाहेबांची शिवसेना पक्षात उरली आहे का?; विद्यमान आमदाराची उद्धव ठाकरेंवर नाराजी