Maharashtra Floods : हिंदू-मुस्लीम तरुणांनी दाखवली एकता, पूरग्रस्तांना केली मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:40 PM2019-08-12T12:40:39+5:302019-08-12T12:46:09+5:30

जळगाव जिल्ह्यात हिंदू-मुस्लीम तरुणांनी सोमवारी (12 ऑगस्ट) बकरी ईदचे औचित्य साधत एकतेचे दर्शन घडविले आहे.

Maharashtra Floods Citizens in jalgaon come forward to help flood-affected Kolhapur and Sangli | Maharashtra Floods : हिंदू-मुस्लीम तरुणांनी दाखवली एकता, पूरग्रस्तांना केली मदत

Maharashtra Floods : हिंदू-मुस्लीम तरुणांनी दाखवली एकता, पूरग्रस्तांना केली मदत

Next
ठळक मुद्देहिंदू-मुस्लीम तरुणांनी बकरी ईदचे औचित्य साधत एकतेचे दर्शन घडविले आहे.राज्यातील पूरग्रस्तांसाठी मदत जमा करण्यात आली. अर्ध्या तासात 11 हजारांचा निधी जमा झाला.

जळगाव - जळगाव जिल्ह्यात हिंदू-मुस्लीम तरुणांनी सोमवारी (12 ऑगस्ट) बकरी ईदचे औचित्य साधत एकतेचे दर्शन घडविले आहे. युथ फॉर हेल्प फाऊंडेशनतर्फे मुस्लीम कब्रस्थान ईदगाह मैदानाजवळ राज्यातील पूरग्रस्तांसाठी मदत जमा करण्यात आली. अवघ्या अर्ध्या तासात 11 हजारांचा निधी जमा झाला.

जळगावातील युथ फॉर हेल्प फाऊंडेशनतर्फे 'चला हात देवू मदतीचा' अभियान सुरू करण्यात आले आहे. सोमवारी ईदगाह मैदानावर बकरी ईदची नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर युथ फॉर हेल्प फाऊंडेशनतर्फे त्याठिकाणी पूरग्रस्तांसाठी मदत जमा करण्यात आली. जळगावातील मुस्लीम बांधवांनी अर्ध्या तासात 11 हजारांची मदत दिली.

महापूर, तसेच अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रात 40 जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी 19 जण सांगली जिल्ह्यातील आहेत. सांगली, कोल्हापूर भागातील तब्बल 200 रस्ते आणि  पूल बंद असल्याने मदत पोहोचविण्यात अडचणी येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील पूरस्थितीची हवाई पाहाणी केली. पुरामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला रशिया दौरा रद्द केला आहे.

राज्यातील दहा जिल्ह्यांत पूरपरिस्थिती असून, 70 तालुके व 761 गावे बाधित झाली आहेत.  4,47,695 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. मदतकार्यात एनडीआरफच्या 32, एसडीआरफच्या 3, लष्कराच्या 21, नौदलाच्या 41, तटरक्षक दलाची 16 पथके कार्यरत आहेत. 226 बोटींद्वारे बचावकार्य सुरू आहे. पुरामुळे 40 व्यक्तींचा मृत्यू झाला, तर चारजण जखमी झाले आहेत, तर 48 जनावरे मृत्युमुखी पडल्याची माहिती माहिती राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे. 

पाणी ओसरताच या रस्त्यांची डागडुजी, सफाई करून तातडीने वाहतूक पूर्वपदावर आणायला हवी. राज्यभरातून मनुष्यबळ आणि संसाधने मागवा, पण तातडीने ट्रान्सफॉर्मर आदींची दुरूस्ती करून वीज पुरवठा सुरळीत करावीत. पूरग्रस्त भागातील रस्ते वाहतूक आणि वीजपुरवठा पुर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिले. स्वच्छतेची मोहीमेसाठी शासकीय, निमशासकीय, खाजगी स्तरावर उपलब्ध होणारी सर्व यंत्रणा कामाला लावा. बाधीत गावांमध्ये औषधांची फवारणी, पूर परिस्थितीमुळे प्रभावीत झालेल्या कुटुंबियांना दैनंदिन आर्थिक मदत तसेच पेट्रोल, डिझेल व गॅसपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. शिरोळ येथे तातडीने चारा पोहोचविण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या. सांगलीत आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीसाठी कवलापूर येथे सुसज्ज विमानतळ बनविण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या.

 

Web Title: Maharashtra Floods Citizens in jalgaon come forward to help flood-affected Kolhapur and Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.