महाराष्ट्रात २३० तर मध्यप्रदेशात १७० वाघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 10:44 PM2019-02-02T22:44:08+5:302019-02-02T22:44:22+5:30
जखमी व मृत्यू झालेल्या प्राण्यांच्या नोंदी सापडेना
जळगाव : महाराष्ट्रात २३० तर मध्यप्रदेशात १७० च्यावर वाघ आढळून येतात, अशी माहिती किशोर रिठे यांनी दिली.
विद्यापीठात आयोजित व्याघ्रसंवर्धन कार्यशाळेत त्यांनी विविध उपायही सुचविले.
अपघातात असंख्य वन्यप्राण्यांचा मृत्यू
काही वर्षापूवी मेळघाटकडून आलेल्या बाजीराव या वाघाचा नागपूर-अमरावती महामार्गावर वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला़ यासारखे असंख्य प्राण्यांचा दुभाजकावरील घनदाट झुडपांमुळे समोरील बाजू न दिसल्यामुळे अपघात होऊन मृत्यू झाला होता़ त्यामुळे महामार्गांवर वन्यप्राण्यांना रस्ता ओलांडण्यासाठी पाईप टाकले जातात़
मात्र, पाच मीटर उंचीचे पाईन न टाकता कमी उंचीची टाकल्यामुळे वन्यप्राणी ही रस्त्यावरून संचार करतात त्यामुळे हा अपघात होता़ यासाठी सर्वांची विचारविनिमय करण्यासाठी बैठक घेण्याची आवश्यकता आहे़ आज काही ठिकाणी कालवे बांधलेले दिसतील़ या कालव्यामुळे वाघ किंवा अन्य प्राण्यांना एकीकडून दुसरीकडे जाता येत नाही़ ज्या कालव्यामंध्ये काही अशांमध्ये वाघ पडून त्यांचा मृत्यू होतो़ त्यामुळे कालवा हा खुला नसावा, असे रिठे यांनी सांगून उपस्थितांना विस्तृत मार्गदर्शन केले़ यानंतर महाराष्ट्रात २३० तर मध्यप्रदेशात ४०० च्यावर वाघ आढळून येतात, अशी माहिती त्यांनी दिली़
दरम्यान, अनेक जखमी व मृत्यू झालेल्या वाघांच्या नोंदी आपल्याकडे सापडत नाही ही खंत आहे़ इमारती, रस्ते तसेच रेल्वे रूळ बांधकामांच्या प्रस्तावांवर आज लक्ष ठेवण्याची गरज आहे़ जेणे करून त्यावर उपाय सुचविता येतील आणि वन्यप्राण्यांना अडथळे निर्माण होणार नाही़ त्यामुळे मानवी जीवनास कुठलाही धोका निर्माण होणार नाही, असे त्यांनी सांगितले़
यावेळी परिषदेला विद्यार्थ्यांसह वन्यजीव संरक्षण संस्था, आॅर्किड नेचर फाउंडेशन, सातपुडा फाउंडेशन, सातपुडा बचाव कृती समितीच्या सदस्यांची उपस्थिती होती़
सूत्रसंचालन बाळकृष्ण देवरे व अर्चना उजागरे यांनी केले तर आभार राहूल सोनवणे यांनी मानले़ यशस्वीतेसाठी अभय उजागरे, राहूल सोनवणे, प्रसाद सोनवणे, एऩसी़वाघ, भूषण चौधरी, विजय रायपुरे, वासुदेव वाढे, सतिश कांबळे, संदीप झोपे आदींनी परिश्रम घेतले़
यावल अभयारण्याचे सांगितले महत्व
पॉवर पॉर्इंट प्रेझेन्टेशनद्वारे किशोर रिठे यांनी व्याघ्र संवर्धनामध्ये यावल अभयारण्याचे महत्व सांगितले. त्यानंतर सातपुडा भुप्रदेश व व्याघ्र संवर्धनाचे महत्व, वन्यजीव संचार मार्ग, समुदायाच्या मालकीचे समुदायाद्वारे संचालित निसर्ग संवर्धन, डोलारखेडा व्याघ्र अधिवास आदी विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले़ यानंतर पर्यावरण प्रशाळा विभागाचे प्रा़ डॉ़ एस़टी़इंगळे यांनी मार्गदर्शन केले़