दि महाराष्ट्र स्टेट कॉ-आॅपरेटिव्ह बँक लि़ मुंबईच्या जळगाव शाखेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:34 PM2018-12-01T12:34:30+5:302018-12-01T12:34:46+5:30
सकाळीच शहरात दाखल
जळगाव- गोलाणी मार्केट येथील दि महाराष्ट्र स्टेट कॉ-आॅपरेटिव्ह बँक लि़ मुंबईच्या जळगाव शाखेचे शनिवारी सकाळी १० वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते उद्घाटन झाले़
दि महाराष्ट्र स्टेट दि महाराष्ट्र स्टेट कॉ-आॅपरेटिव्ह बँक लि़ मुंबईच्या जळगाव शाखेच्या उद्घाटनानिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख सकाळीच शहरात दाखल झाले होते़ मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन हे पोलिसांच्या ताफ्यासह गोलाणी मार्केट परिसरात तैनात होते़ दरम्यान, मंत्र्यांसाठी असलेल्या सुरक्षेच्या ताफ्याची गर्दी पाहून बघ्यांची प्रचंड गर्दी गोलाणी मार्केटच्या आरावात झाली होती़ सकाळी १० वाजता पालकमंत्री व सहकारमंत्रींनी कार्यक्रमास्थळी हजेरी लावल्यानंतर त्यांच्या हस्ते बँकेचे व एटीएमचे उद्घाटन करण्यात आले़ उद््घाटन कार्यक्रमाला यावेळी उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, सदस्य अविनाश महागांवकर, संजय भेंडे, व्यवस्थापकीय संचालक डॉ़ अजित देशमुख, शाखा व्यवस्थापक दिलीप पाटील, कर्मचारी अरूण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते़