जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीला २१ पैकी २० जागांवर विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 04:53 PM2021-11-22T16:53:39+5:302021-11-22T16:53:56+5:30

या निवडणुकीत भाजपने बहिष्कार टाकला होता. मात्र, तरीही राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपच्या काही असंतुष्टांनी मिळून शेतकरी विकास पॅनल तयार केले होते. मात्र, निवडणुकीत सहकार पॅनलने शेतकरी पॅनलचा धुव्वा उडविला

Mahavikas Aghadi wins 20 out of 21 seats in Jalgaon District Bank | जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीला २१ पैकी २० जागांवर विजय

जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीला २१ पैकी २० जागांवर विजय

Next
ठळक मुद्देया निवडणुकीत भाजपने बहिष्कार टाकला होता. मात्र, तरीही राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपच्या काही असंतुष्टांनी मिळून शेतकरी विकास पॅनल तयार केले होते. मात्र, निवडणुकीत सहकार पॅनलने शेतकरी पॅनलचा धुव्वा उडविला

जळगाव : जिल्हा बँकेच्या २१ पैकी २० जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलने विरोधकांचा धुव्वा उडविला आहे. २१ पैकी ११ जागा माघारीअंतीच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित १० जागांसाठी रविवारी मतदान झाले होते. सोमवारी जिल्हा बँकेच्या १० जागांसाठी मतमोजणी झाली. यामध्ये भुसावळच्या जागेव्यतिरिक्त राखीव मतदारसंघाच्या ६ व सोसायटी मतदारसंघाच्या ३ अशा एकूण ९ जागांवर सहकार पॅनलचे उमेदवार विजयी झाले.

या निवडणुकीत भाजपने बहिष्कार टाकला होता. मात्र, तरीही राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपच्या काही असंतुष्टांनी मिळून शेतकरी विकास पॅनल तयार केले होते. मात्र, निवडणुकीत सहकार पॅनलने शेतकरी पॅनलचा धुव्वा उडविला. 

जिल्हा बँकेचे पक्षीय बलाबल

एकूण जागा २१
राष्ट्रवादी कॉंग्रेस - १२

शिवसेना - ६
कॉंग्रेस - २

भाजप - १

हे आहेत विजयी उमेदवार
रावेर मतदार संघ - जनाबाई महाजन
यावल मतदार संघ - विनोद पाटील
चोपडा मतदार संघ - घनश्याम अग्रवाल
भुसावळ मतदार संघ - संजय सावकारे
इतर संस्था मतदार संघ - गुलाबराव देवकर
ओबीसी -डॉ.सतीश पाटील
एससी.एसटी - श्यामकांत सोनवणे
एन.टी. - मेहताबसिंग नाईक
महिला राखीव - ॲड. रोहिणी खडसे, शैलजादेवी निकम

Web Title: Mahavikas Aghadi wins 20 out of 21 seats in Jalgaon District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.