फॉरेन्सिक ऑडिटर नसताना केले महावीर जैन याने ‘बीएचआर’चे ऑडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:42 AM2020-12-11T04:42:29+5:302020-12-11T04:42:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महावीर मानकचंद जैन (३७, रा.गुड्डूराजा नगर, एसएमआयटी कॉलेज रोड, जळगाव) हा सनदी लेखाधिकारी आहे. ...

Mahavir Jain audited BHR without a forensic auditor | फॉरेन्सिक ऑडिटर नसताना केले महावीर जैन याने ‘बीएचआर’चे ऑडिट

फॉरेन्सिक ऑडिटर नसताना केले महावीर जैन याने ‘बीएचआर’चे ऑडिट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महावीर मानकचंद जैन (३७, रा.गुड्डूराजा नगर, एसएमआयटी कॉलेज रोड, जळगाव) हा सनदी लेखाधिकारी आहे. फॉरेन्सिक ऑडिटर नसताना त्याने ‘बीएचआर’चे ऑडिट केले. कंडारेनेच कागदपत्रे जैनला पुरविली. वास्तविक फॉरेन्सिक ऑडिटर शासनाने नियुक्त केलेला असताना शुल्कदेखील शासनाचे अदा करणे अपेक्षित होते; मात्र कंडारेनेच जैन याला शुल्क अदा केले.

शासनाचे पॅनल असताना त्यातीलच ऑडिटरकडून ऑडिट होणे अपेक्षित होते. जैन हा एमआयडीसीतील मालमत्ता हस्तांतर करण्यासह इतर मालमत्ता खरेदी-विक्रीचाही तो व्यवसाय करतो. कर्ज प्रकरणे मंजूर करण्यासाठीदेखील त्याचा पुढाकार असतो. पुण्याच्या पोलिसांनी त्याची घर व कार्यालय झडती घेतली असता, त्यात अवसायक जितेंद्र कंडारे व इतरांशी संबंधित काही पुरावे मिळून आले होते. कंडारे याने सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, पुणे यांना दिलेल्या पत्रात मालमत्ता लिलावाद्वारे विक्री करताना ठेवीदारांच्या ठेवी वर्ग केल्याचे नमूद नाही. ते पत्र महावीर जैन याच्या कार्यालयात मिळून आले. ही बाब जैन याने ऑडिट रिपोर्टमध्ये नमूद न करता कंडारे याला मदत करण्याच्या उद्देशाने लपवून ठेवली. खोटा दस्तऐवज तयार करून ते खरे असल्याचे भासवून स्वत: व इतरांच्या फायद्यासाठी त्याचा उपयोग केला. त्याशिवाय करण बाळासाहेब पाटील यांची साडेतीन कोटी रुपयांच्या कर्जाची फाइलदेखील आढळून आली होती. वास्तविक या फाइलचा व ऑडिट रिपोर्टचा काहीही संबंध नाही. कंडारे हा मोठ्या कर्जाच्या फाइल जैन याच्या कार्यालयात घेऊन जात होता. ही बाब जैन याच्या तपासातही निष्पन्न झाली आहे.

Web Title: Mahavir Jain audited BHR without a forensic auditor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.