बीएचआर प्रकरणात महावीर जैनला जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:17 AM2021-04-20T04:17:30+5:302021-04-20T04:17:30+5:30
जळगाव : बीएचआर प्रकरणात अटकेत असलेल्या महावीर मानकचंद जैन (३७, रा. गुड्डूराजानगर) याला पुणे विशेष न्यायालयाने सोमवारी अटी-शर्ती व ...
जळगाव : बीएचआर प्रकरणात अटकेत असलेल्या महावीर मानकचंद जैन (३७, रा. गुड्डूराजानगर) याला पुणे विशेष न्यायालयाने सोमवारी अटी-शर्ती व एक लाखाच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला.
बीएचआर संस्थेत ठेवीदारांची फसवणूक व अपहार झाल्याप्रकरणी पुण्याच्या डेक्कन पोलीस ठाण्यात सेवानिवृत्त शिक्षिका रंजना घोरपडे यांच्या फिर्यादीवरून २५ नोव्हेंबर २०२० रोजी गुन्हा दाखल झाला होता. अवसायक जितेंद्र कंडारे, उद्योजक सुनील झंवर, सीए महावीर जैन, विवेक ठाकरे, धरम सांखला यांच्यासह इतरांना यात आरोपी करण्यात आले होते. महावीर जैन, ठाकरे आदींना २८ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून जैन कारागृहात होता. सोमवारी विशेष न्यायालयाने एक लाख रुपयांचा वैयक्तिक जात मुचलका व अटी-शर्तीवर जामीन मंजूर केला. सरकार पक्षातर्फे ॲड. प्रसाद कुलकर्णी यांनी बाजू मांडली.