माहेश्वरी परिचय मेळाव्यात १५ विवाह जुळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 01:06 PM2019-08-26T13:06:37+5:302019-08-26T13:07:33+5:30

३५० युवक- युवतींची होती उपस्थिती : माहितीसाठी मोबाईल अ‍ॅप कार्यरत

 At the Maheshwari Introduction Fair, 3 marriages were matched | माहेश्वरी परिचय मेळाव्यात १५ विवाह जुळले

माहेश्वरी परिचय मेळाव्यात १५ विवाह जुळले

Next

जळगाव : माहेश्वरी विवाह सहयोग समितीतर्फे आयोजित परिचय मेळाव्यात ३५० युवक-युवतींनी परिचय करून दिला़ या मेळाव्यात १५ विवाह जुळले़ छत्तीसगड येथील माजी खासदार प्रदीप गांधी यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले़ यावेळी समाजातील वधू-वरांची माहिती असलेले माहेश्वरी विवाह सहयोग या मोबाईल अ‍ॅप चे उद्घाटन मान्यवरांनी केले़
मेळाव्यात ५३९ युवक युवतींनी नोंदणी केली होती़ राज्यासह कर्नाटक, छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, दिल्ली या राज्यातील विवाहेच्छूक वधू-वरांनी उपस्थिती दिली होती. मेळाव्यात विवाहेच्छूक वधू-वरांसह त्यांच्या पालकांनी एकमेकांशी संवाद साधला.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून अ. भा. संयुक्त मंत्री सतीश चरखा, माजी महापौर नितीन लढ्ढा, सहयोग समितीचे संस्थापक अध्यक्ष बाळकृष्ण बेहेडे, अध्यक्ष शामसुंदर झंवर, जिल्हा अध्यक्ष मनीष झंवर, उपाध्यक्ष वासुदेव बेहेडे, सचिव सुरजमल सोमाणी, डॉ. जगदीश लढ्ढा, सुभाष जाखेटे, विवेक सोनी, प्रकल्प प्रमुख विनोद मुंदडा, माणकचंद झंवर आदी उपस्थित होते.
सुरजमल सोमाणी यांनी प्रास्ताविक केले़ परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले़ विशाल मंत्री, परेश जखोटिया ( नाशिक ) यांनी बनविल्या अ‍ॅपचेही उद्घाटन झाले. जिल्हाध्यक्ष मनीष झंवर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन बी. जे. लाठी, अश्विनी देपुरा, जगदीश जाखेटे, राधिका जाखेटे, रमण लाहोटी, मयूर जाखेटे, वैष्णवी झंवर, निधी भट्टड, यांनी तर आभार जगदीश लढ्ढा यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुनील झंवर, सुनील मंत्री, संजय बिर्ला, राहुल झंवर, कैलास लाठी, दीपक लढ्ढा, राधेशाम बजाज, तेजस देपुरा, गिरीश झंवर, प्रदीप मनियार, पुष्पा झंवर, वासंती बेहेडे, रुपाली लाठी, योगेश कासट, सुरेश न्याती, दीपक कासट, अभिजित झंवर, अजय दहाड, योगेश मंडोरा, वीणा सोमाणी, भारती झंवर, शिवनारायण तोष्णीवाल, उर्मिला झंवर, लोकेश राठी, नरेंद्र काबरा, नितीन देपुरा आदींनी परिश्रम घेतले.
 

Web Title:  At the Maheshwari Introduction Fair, 3 marriages were matched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.