माहेश्‍वरी समाजातर्फे महेश नवमी उत्सवानिमित्त अभिषेकसह, आंब्याची रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:13 AM2021-06-20T04:13:37+5:302021-06-20T04:13:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव- श्री माहेश्‍वरी युवा संघटना व शहर माहेश्‍वरी सभेतर्फे महेश नवमी उत्सवानिमित्त शनिवारी शहरात विविध धार्मिक, ...

Maheshwari Samaj with Abhishek on the occasion of Mahesh Navami, Mango Raas | माहेश्‍वरी समाजातर्फे महेश नवमी उत्सवानिमित्त अभिषेकसह, आंब्याची रास

माहेश्‍वरी समाजातर्फे महेश नवमी उत्सवानिमित्त अभिषेकसह, आंब्याची रास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव- श्री माहेश्‍वरी युवा संघटना व शहर माहेश्‍वरी सभेतर्फे महेश नवमी उत्सवानिमित्त शनिवारी शहरात विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले.

सकाळी संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधवांच्या उपस्थितीत बालाजी मंदिरात भोलेनाथ यांचा अभिषेक व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर पांजरापोळ येथील गोशाळेत गोसेवा व महाप्रसाद वितरण करण्यात आले. अयोध्यानगरातील हनुमान मंदिर परिसरातील महादेव मंदिरात आंब्याच्या फळांची रास साकारण्यात आली होती. ही रास किशोरी मंडळाने साकारली होती.

यांची होती उपस्थिती

माहेश्‍वरी बोर्डींगमध्ये रक्तदान शिबिर आणि विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. रक्तदान शिबिरात ३५ दात्यांनी रक्तदान केले. तसेच आदर्शनगरात अन्नदानाचा कार्यक्रम झाला. या वेळी युवा संघटनेचे अध्यक्ष मधुर झंवर, शहर सभेचे अध्यक्ष योगेश कलंत्री, श्याम कोगटा, शहर सचिव विलास काबरा, जिल्हाध्यक्ष नारायण लाठी, सचिव माणकचंद झंवर, अयोध्यानगर झोन अध्यक्ष सुनील काबरा, सचिव दीपक हेडा, उपाध्यक्ष सूर्यकांत लाहोटी, कोषाध्यक्ष नितीन काबरा, प्रवीण सोनी, सुरेश मंडोरा, संजय चितलांगे, राकेश लढ्ढा, जुगलकिशोर धूत, अरुण लाहोटी, विनय बाहेती, संजय बिर्ला, राजेंद्र माहेश्‍वरी, डा.गोविंद मंत्री, नीलेश झंवर, केदार मुंदडा, साक्षी चितलांगे, प्रमोद हेडा, राजेश लढ्ढा, योगेश धूत, बहुबेटी मंडळाचे अध्यक्ष मनाली जेठलिया, पायल काबरा, साक्षी चितलांगे, तुलसी बाहेती, महिला मंडल अध्यक्ष साधना लाहोटी आदी उपस्थित होते.

Web Title: Maheshwari Samaj with Abhishek on the occasion of Mahesh Navami, Mango Raas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.