जळगाव जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांमध्ये महिलाराज

By admin | Published: January 6, 2017 05:21 PM2017-01-06T17:21:25+5:302017-01-06T17:21:25+5:30

आगामी काळात होत असलेल्या पंचायत समिती सभापतीपदासाठी शुक्रवार ६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आरक्षण सोडत काढण्यात आली.

Mahilaraj in 9 Panchayat Samities in Jalgaon District | जळगाव जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांमध्ये महिलाराज

जळगाव जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांमध्ये महिलाराज

Next

ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 6 - आगामी काळात होत असलेल्या पंचायत समिती सभापतीपदासाठी  आज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आरक्षण सोडत काढण्यात आली. १२ ठिकाणी चक्रानुक्रमानुसार तर नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या दोन व सर्वसाधारण महिला या तीन जागांसाठी सोडत काढण्यात आली. यंदा ९ पंचायत समित्यांमध्ये महिला राज राहणार आहे.
ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे सभापतीपद १३ मार्च २०१७ पासून पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी सोडत पद्धतीने आरक्षित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे, निवडणूक उपजिल्हाधिकारी मनोहर चौधरी, ग्रामपंचायत शाखेचे नायब तहसीलदार सुभाष सोनवणे उपस्थित होते.
सुरुवातील जिल्हाधिकाऱ्यांनी १५ पंचायत समित्यांमध्ये असलेले सद्यस्थितीचे आरक्षण आणि चक्रानुक्रमे आरक्षणाची पद्धत समजावून सांगितली. शासनाने पंचायत समितीनुसार निश्चित केलेल्या आरक्षित जागांची माहिती उपस्थित नागरिकांना दिली. सुरुवातीला अनुसूचित जाती व जमाती या जागांच्या पदासाठी एकुण लोकसंख्येची टक्केवारी उतरत्या क्रमाने लावून आरक्षण काढण्यात आले. त्यानंतर सन १९९५ ते २०१७ या दरम्यान चक्रानुक्रमानुसार आरक्षण घोषित करण्यात आले.
ही प्रक्रिया झाल्यानंतर उर्वरित तीन जागांसाठी सोडत काढण्यात आली. त्यात नागरिकांचा मागास प्रवर्ग या दोन सभापतीपदासाठी तर सर्वसाधारण महिला या एक पदासाठी अशा तीन जागांसाठी सोडत काढण्यात आली.
पंचायत समितीनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे
जिल्हाधिकाऱ्यांनी पंचायत समिती सभापतीपदासाठी घोषित केलेले आरक्षण पुढील प्रमाणे. जळगाव (अनुसूचित जाती महिला), मुक्ताईनगर (अनुसूचित जमाती महिला), एरंडोल (अनुसूचित जमाती महिला), अमळनेर (अनुसूचित जमाती),जामनेर (नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला),धरणगाव (नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला),भुसावळ (नागरिकांचा मागास प्रवर्ग), बोदवड (नागरिकांचा मागास प्रवर्ग), यावल (सर्वसाधारण महिला), रावेर (सर्वसाधारण महिला), पारोळा (सर्वसाधारण महिला),चाळीसगाव (सर्वसाधारण महिला), पाचोरा (सर्वसाधारण), चोपडा (सर्वसाधारण), भडगाव (सर्वसाधारण) असे आरक्षण राहणार आहे.
९ पंचायत समित्यांमध्ये महिला राज
शुक्रवारी झालेल्या आरक्षण सोडतीनंतर ९ पंचायत समित्यांमध्ये महिला राज राहणार आहे. त्यात जळगाव, मुक्ताईनगर, एरंडोल,जामनेर, धरणगाव, यावल, रावेर, पारोळा, चाळीसगाव या पंचायत समित्यांचा समावेश आहे. त्यात अनुसूचित जाती महिला १, अनुसूचित जमाती १, अनुसूचित जमाती महिला २, नागरिकांचा मागास प्रवर्ग २, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला २, सर्वसाधारण ३, सर्वसाधारण महिला ४ अशा जागा आहेत.

Web Title: Mahilaraj in 9 Panchayat Samities in Jalgaon District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.