अन्नाची पाकिटे फेकली नसून अंगणवाडीतून चोरी झाल्याचा सेविकेचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 05:51 PM2020-09-12T17:51:35+5:302020-09-12T17:53:14+5:30

उकिरड्यावर फेकलेल्या स्थितीत आढळलेली अंगणवाडीतील अन्नाची पाकिटे ही फेकलेली नसून, चोरीस गेल्याचा दावा अंगणवाडीसेविकेने केला आहे.

The maid claims that the food was not thrown away but was stolen from the Anganwadi | अन्नाची पाकिटे फेकली नसून अंगणवाडीतून चोरी झाल्याचा सेविकेचा दावा

अन्नाची पाकिटे फेकली नसून अंगणवाडीतून चोरी झाल्याचा सेविकेचा दावा

Next
ठळक मुद्दे‘लोकमत’च्या वृत्ताची दखलसंबंधित अंगणवाडीसेविकेकडून मागवला खुलासाअंगणवाडीसेविकेची लावली चौकशी

गोपाळ व्यास
बोदवड, जि.जळगाव : शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोलीच्या पाठीमागे उकिरड्यावर फेकलेल्या स्थितीत आढळलेली अंगणवाडीतील अन्नाची पाकिटे ही फेकलेली नसून, चोरीस गेल्याचा दावा अंगणवाडीसेविकेने केला आहे. दरम्यान, या अन्न पाकिटांची मुदत अजून चार महिन्यांपर्यंत असल्याचे त्या पाकिटांवर नमूद तारखेवरून दिसून येते.
जिल्हा परिषद शाळेच्या मागे उकिरड्यावर लहान व कुपोषित, कमी उंची, उंची न वाढणारे (सयाम) अशा बालकांना पोषण आहार म्हणून देण्यात येणारे व शासनाकडून पुरवण्यात येणारी एनर्जी डेन्स नियुट्रेशन फूडची जवळपास १०० पाकिटे फेकण्यात आल्याचे वृत्त शनिवारी ‘लोकमत’ला झळकताच एकच खळबळ उडाली.
वृत्त आल्यानंतर अंगणवाडीसेविकांची धावपळ उडाली. अंगणवाडीसेविकेने ही पाकिटे उकिरड्यावरून तत्काळ उचलली व अंगणवाडीत आणली.
यावर अंगणवाडीसेविका उगले यांनी सांगितले की, आम्ही अंगणवाडीची स्वच्छता केली. तेव्हा या पाकिटांचे खोके चुकून खिडकीत ठेवले गेले. ते कोणीतरी फेकले असतील. अगोदरही येथे चोऱ्या झाल्या असल्याचे उगले यांनी सांगितले. ते चोरीस गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. याबाबत पोलिसांशी संपर्क साधला असता, अशी कोणतीही तक्रार कोणी दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, ही एनर्जी डेन्स नियुट्रेशन फूडची फेकलेली पाकिटे ही डिसेंबर २०२० अखेरपर्यंत खाण्यास व आरोग्यास हितकारक असल्याचे त्यावर लिहिले आहे.
चोरट्यांनी या खिडकीतून पाकीट लांबवले तर ते चोरून का नेले नाही? तसेच एकही पाकीट फोडून का पाहिले नाही? तसेच अन्य कोणत्याही वस्तूची फेकाफेकही केली नाही.
तालुक्यात शासनाकडून लहान बालकांना मिळणारे मूग डाळ, चना, तांदूळ, गहू ही पाकिटे धान्य दुकानदारांना विकले जात असल्याचा प्रकारही घडला आहे. त्यावर प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे, अशी पालकांची अपेक्षा आहे.

‘संबंधित अंगणवाडी सेविकेकडून खुलासा मागितला आहे. सोमवारी चौकशी करण्यात येणार आहे.
-दमयंती इंगळे, एकात्मिक बालविकास अधिकारी, बोदवड

Web Title: The maid claims that the food was not thrown away but was stolen from the Anganwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.