विनयभंगाच्या गुन्ह्यात तरुणासह आईला चार महिने कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 11:43 AM2019-03-01T11:43:32+5:302019-03-01T11:45:19+5:30

सरकारपक्षातर्फे ९ साक्षीदार तपासले

Maid held for four months in jail for molestation | विनयभंगाच्या गुन्ह्यात तरुणासह आईला चार महिने कारावास

विनयभंगाच्या गुन्ह्यात तरुणासह आईला चार महिने कारावास

googlenewsNext


जळगाव : अंगणात कचरा का लावला याचा जाब विचारण्यास गेलेल्या महिलेच्या मुलीचा घरास घुसून विनयभंग केल्याच्या गुन्ह्यात अमोल सुभाष सूर्यवंशी व त्याची आई रेखा या दोघांना न्या.एम.एम.चौधरी यांनी गुरुवारी ४ महिने सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतील ८ हजार रुपये पीडितेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
शहरातील एका महिलेने ८ नोव्हेंबर २०१५ रोजी शेजारी राहणाऱ्या महिलेला झाडू मारल्यानंतर कचरा माझ्या अंगणात का लावला, तुला हे शोभते का? असे विचारले असता दोघांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी अमोल याने महिलेच्या घरात घुसून अश्लिल शिवीगाळ करुन तिच्या मुलीशी गैरवर्तन केले होते. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात आई व मुलाविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. उपनिरिक्षक राजेश घोळवे व महिला उपनिरक्षक सुजाता राजपूत यांनी गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. यात सरकारपक्षातर्फे ९ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. रंजना पाटील, अ‍ॅड. निखिल कुळकर्णी व अ‍ॅड. सुप्रिया क्षीरसागर यांनी काम पाहिले.
कलम व शिक्षा... कलम ३५४(अ) मध्ये १ दोघांना प्रत्येकी ४ महिने सश्रम कारावास व ३ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास २० दिवस कारावास. २९४ मध्ये दोघांना प्रत्येकी ३ महिने सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ७ दिवसांचा कारावास व कलम ५०४ मध्ये प्रत्येकी ३ महिने कारावास व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ७ दिवसाची कैद

Web Title: Maid held for four months in jail for molestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.