अशुद्ध अन्न, पाणी व हवा आजाराचे मूळ कारण - वैद्य सी.व्ही. त्रिपाठी यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 11:57 AM2017-10-18T11:57:22+5:302017-10-18T11:57:35+5:30
धन्वंतरी जयंतीनिमित्त वैद्य जे.जे. पाटील व पराग जहागिरदार यांचा सत्कार
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 18 - अशुद्ध पाणी, अन्न आणि हवा हे आजाराचे मूळ असून त्यावर पुरातनकाळापासून सुरु असलेल्या आयुर्वेद उपचार पद्धतीतून उपचार करणे शक्य आहे, असे प्रतिपादन वैद्य सी.व्ही. त्रिपाठी यांनी केले. या वेळी वैद्य जे.जे.पाटील, वैद्य पराग जहागिरदार यांचा सन्मान करण्यात आला.
आयुव्रेदीक डॉक्टरांच्यावतीने मंगळवारी आयएमए सभागृहात धन्वंतरी पूजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. या वेळी सी.व्ही. त्रिपाठी यांच्यासह डॉ. प्रताप जाधव, वैद्य किशोर मोरे, वैद्य पी.एस. चौधरी उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते धन्वंतरी पूजन करण्यात आले. डॉ. प्रताप जाधव यांनी वैद्यकशास्त्रात आयुर्वेदाचे योगदान व परिणामात्मक उपचार पद्धती याविषयी माहिती दिली.
वैदय पी.एस.चौधरी यांनी धन्वंतरींच्या कार्याचा आढावा घेतला. किशोर मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन वैद्य नरेंद्र गुजराथी यांनी केले.
आयुर्वेदातील प्रत्येक वनस्पती ही औषधी आहे. पृथ्वी, मानवाच्या जन्मापासून आयुर्वेदाचा उपयोग केला जात आहे. यामुळे आजार होवू नये, याचबरोबर झाल्यानंतरही त्यांचे समुळ उच्चाटन करण्याची क्षमता आयुर्वेदात असल्याचे वैद्य जे.जे.पाटील यांनी सांगितले. विविध कटीबंधात औषध निर्मिती होत आहे. पाश्चात्य देशात निर्माण होणारी औषधी भारताला तारु शकत नाही असे जे.जे. पाटील यांनी सांगून जगात काही रोगांनी डोकेवर काढले आहे. यामुळे 75 टक्के लोक कायम आजारी असतात. त्यावर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वाचे काम आता आयुर्वेद करीत असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.