मुख्य रस्ते व संकुल परिसर बनले वाहनतळ, ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:21 AM2021-07-07T04:21:18+5:302021-07-07T04:21:18+5:30

वाहने लावावी कोठे? जुन्या नगरपालिका जागेवरील व साने गुरुजी रुग्णालयाजवळील वाहनतळ वगळता मनपाच्यावतीने इतर ठिकाणी वाहनतळाची (पार्किंग) व्यवस्था न ...

Main roads and complexes became parking lots, traffic jams in places | मुख्य रस्ते व संकुल परिसर बनले वाहनतळ, ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी

मुख्य रस्ते व संकुल परिसर बनले वाहनतळ, ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी

Next

वाहने लावावी कोठे?

जुन्या नगरपालिका जागेवरील व साने गुरुजी रुग्णालयाजवळील वाहनतळ वगळता मनपाच्यावतीने इतर ठिकाणी वाहनतळाची (पार्किंग) व्यवस्था न केल्याने बाजारपेठेत आपली वाहने कोठे लावावी, असा प्रश्न वाहनधारकांना पडतो. त्यामुळे कोर्ट चौक ते चित्रा चौकादरम्यान रस्त्याच्या कडेलाच अशा प्रकारे दुचाकी लावलेल्या असतात. या दुचाकीमुळे अनेक वेळा रस्त्यावर वाहतूक कोंडीदेखील होते. तरीही त्याकडे लक्ष दिले जात नाही.

दुचाकींच्या ‘गर्दी’तून वाट काढणे कठीण

मुख्य बाजारपेठ असो की महापालिकेचे व्यापारी संकुल असो, कोठेही गेल्यानंतर अस्ताव्यस्त लावलेल्या वाहनांच्या ‘गर्दी’तून शहरवासीयांना मार्ग काढावा लागतो. शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या गोलाणी मार्केटमध्ये दुकानांसमोरील मोकळ्या जागेत अशा प्रकारे दुचाकी लावलेल्या असतात. त्यामुळे अनेक वेळा पायीदेखील जाता येत नाही.

ठिकठिकाणी अडथळ्यांची शर्यत

शहरातील रस्त्यांची अगोदरच दुरवस्था असून व संकुल परिसरात ते अरुंददेखील असल्याने तेथून वाहन काढताना वाहनधारकांची चांगलीच कसरत होते. त्यात गोलाणी मार्केटकडून एम.जी. रोडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला दुचाकी व हातगाड्या लावल्याने तेथून वाहने काढणे कठीण होते. यामुळे या परिसरात दिवसभरात वारंवार वाहतुकीची कोंडी होते.

वाहन अडकले म्हणजे कसरतच

पार्किंगअभावी दुकानांच्या समोर दुचाकी लावून खरेदीसाठी गेल्यानंतर या दुचाकीच्या आजूबाजूला काही वेळातच इतरही दुचाकी लावल्या जातात. एखाद्याची दुचाकी सर्वात पुढे लावलेली असल्यास ती काढताना मोठी कसरत करावी लागते. आजूबाजूच्या दुचाकी बाजूला केल्यानंतर त्या मध्येच अडथळा ठरतात व अधिकच कोंडी होत असते.

Web Title: Main roads and complexes became parking lots, traffic jams in places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.