सातत्य कायम राहणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 09:20 PM2019-02-23T21:20:24+5:302019-02-23T21:24:02+5:30
कार्यतत्परतेसह शिस्तीचा बडगा हवाच
हितेंद्र काळुंखे
जळगाव: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन.पाटील यांनी गेल्या महिन्यात कार्यभार स्विकारल्यानंतर आपल्या कामाची चुणूक दाखविण्यास सुरुवात केली आहे. कामामधील गतीमानता आणि शिस्तीचा बडगा असा प्रभाव त्यांचा पडत आहे. नक्कीच जिल्हा परिषदेच्यादृष्टीने ही प्रशंसनीय बाब आहे, कामाची हीच पद्धत कायम राहिल्यास जिल्हा परिषदेचा कारभार आधिकाधिक चांगला होवू शकतो.
डॉ.बी. एन. पाटील हे जळगाव येथे रुजू झाल्यापासून याच पद्धतीने काम करीत असून त्यांनी सुरुवातीलाच विविध विभागाची अचानक हजेरी घेत अनेकांना नोटीस देत आपला दबदबा निर्माण केला. तसेच नेहमीच याप्रकारे अचानक तपासणी करण्याच्या सूचना प्रशासन विभागाला दिल्या आहेत. ही जबाबदारी प्रशासन विभागानेही पार पाडणे गरजेचे आहे.याचबरोबर ही जबाबदारी पार पाडली जात आहे की, नाही ?हे देखील पाहिले गेले पाहिजे. अन्यथा एकदा कारवाई झाली की पुन्हा अनेक महिने हा विषय कोणाच्याही स्मरणात राहत नाही व कर्मचाऱ्यांन हेच फावते.
अर्थातच बºयाचदा एखादा अधिकारी नव्याने कारभार स्विकारल्यावर कार्यतत्परता दाखवत आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतो मात्र काही दिवस गेल्यानंतर ही कार्यत्परता दिसून येत नाही, असे मात्र होवू नये.
दरम्यान १०० टक्के अतिक्रमणे काही दिवसातच नियमीत करण्याचे डॉ.पाटील यांचे काम देखील उल्लेखनीय असून इतक्यात पाचोरा पंचायत समितीच्या पाच अभियंत्यांना गैरहजेरीच्या कारणावरुन निलंबित केल्याने मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी खळबळ उडवून दिली आहे.त्यांचा हा कामाचा धडका आणि शिस्तीचा दरारा कायम दिसावा, अशी अपेक्षा सर्वसामान्यांना आहे.