लासलगाव येथे मोठा अपघात, रेल्वेच्या दुरुस्ती वाहनाने धडक दिल्याने चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू
By Suyog.joshi | Published: February 13, 2023 08:29 AM2023-02-13T08:29:05+5:302023-02-13T10:09:28+5:30
Lasalgaon Railway Accident: लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ आज पहाटे सव्वा सहाच्या सुमारास रेल्वे मार्गाची देखभाल करणाऱ्या रेल्वे टावरने (लाईट दुरुस्ती करणारे इंजिन) उडविल्याने चार जणांचा मृत्यू झाला.
- सुयोग जोशी
नाशिक - लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ आज पहाटे सव्वा सहाच्या सुमारास रेल्वे मार्गाची देखभाल करणाऱ्या रेल्वे टावरने (लाईट दुरुस्ती करणारे इंजिन) उडविल्याने चार जणांचा मृत्यू झाला. हे सर्व कर्मचारी लासलगाव परिसरातील आहे.
त्यांची नावे खालील प्रमाणे
1) संतोष भाऊराव केदारे वय 38 वर्षे
2) दिनेश सहादु दराडे वय 35 वर्षे
3) कृष्णा आत्मराम अहिरे वय 40 वर्षे
4) संतोष सुखदेव शिरसाठ वय 38 वर्षे
पोलीस उप उपनिरीक्षक गवळी, लासलगाव पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस उपनिरीक्षक अजिनाठ कोठुले लासलगाव येथील स्टेशन परिसरातील कार्यकर्त्यांनी या चौघांना रुग्णालयात आणले असताना डॉक्टर स्वप्नील पाटील यांनी तपासणी करून मृत झाल्याचे घोषित केले. नंतर चारही कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी लासलगाव परिसरामध्ये आक्रोश केला.
टॉवर चालक, मुख्य अधिकारी यांना लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. निफाडच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, उपअधीक्षक अर्जुन भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेनंतर पोलीस उप उपनिरीक्षक गवळी, लासलगाव पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ कोठुले उपस्थित आहेत.
कर्मचाऱ्यांचे रेल रोको आंदोलन
ठार झालेल्या चार कर्मचारी यांचे निषेधार्थ रेल्वे कर्मचाऱ्यांनी लासलगाव रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन केले. काही वेळ गोदावरी एक्सप्रेस रोखून धरली होती. कर्मचारयांनी अप रेल्वे ट्रकवर उतरून प्रशासन विरोधात घोषणा दिली. घटना घडून तीन तास झाले तरी वरिष्ठ अधिकारी न आल्याने तीव्र संताप व्यक्त केला आहे