सूर्याचा 14 रोजी मकर राशीत प्रवेश, सूर्यास्तार्पयत पुण्यकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 01:15 PM2018-01-05T13:15:55+5:302018-01-05T13:17:01+5:30
बाजारात तीळला मागणी
प्रसाद धर्माधिकारी / ऑनलाईन लोकमत
नशिराबाद, जि. जळगाव, दि. 05- परस्परातील मतभेद विसरुन स्नेह वृद्धींगत व्हावा यासाठी तीळगुळ घ्या गोड गोड बोला सांगणारा मकर संक्रांतीचा सण यंदा 14 जानेवारीला साजरा होत आहे. 14 रोजी रविवारी दुपारी 1 वाजून 46 मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार असून सूर्यास्तार्पयतच संक्रांतीचा पुण्यकाल आहे.
माघ महिन्यात मकर संक्रमण होत असते. यंदा 14 रोजी ज्येष्ठा दुपारी 1 वाजून 14 मिनिटांर्पयत असून त्यानंतर मूळ नक्षत्र आहे. महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. संक्रांतीच्या पूर्वदिनी भोगी, 14 रोजी संक्रांत दुस:या दिवशी किंक्रांत अशी नावे आहेत. संक्रांतीला परस्परांना तिळगुळ देत स्नेह वृद्धींगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रीया यादिवशी हळदी-कुंकू देत सौभाग्यवाण देतात.
तिळाचे महत्व
यादिवशी तिलमिश्रीत उदकाने स्नान करावे. तिळांचे उटणे अंगास लावणे, तिलतर्पण, तिलहोम, तिलभक्षण व तिलदान असा प्रकारे तिळाचा उपयोग केल्यास पुण्यप्रद असल्याचे शास्त्रवचन आहे.
धान्याचे वाण देण्याची प्रथा
भारत हा कृषीप्रधान देश असून संस्कृती कृषी संस्कृती आहे. यादिवसात शेतात आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोरे, तीळ, गव्हाची ओंबी, सौभाग्यवायन देवीला अर्पण करुन वाण दिले जाते, अशी प्रथा आहे. यांनतर काही काळ घरोघरी महिलांच्या हळदीकुंकवाचा कार्यक्रमाही होतो.
अशी आहे संक्रांत
यंदा वाणिज करणावर संक्रांत होत आहे. वाहन रेडा असून उपवाहन उंट आहे. देवीने निळे वस्त्र परिधान केले आहे. हातात तोमर घेतले असून अळिताचा टिळा लावलेला आहे. वयाने वृध्द आहे. सुगंधाकरीता रुई घेतली आहे. दही भक्षण करीत असून नीलरंगाने र} आभूषणार्थ धारण केले आहे. वारनाव घोरा असून नाक्षत्रनाव राक्षसी आहे. उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे व नैऋत्य दिशेकडे पाहत आहे.