जिल्हा काँग्रेस व महिला काँग्रेसतर्फे मकरसंक्रांती सण उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 16:30 IST2021-01-14T16:29:59+5:302021-01-14T16:30:17+5:30
भुसावळ येथे जिल्हा काँग्रेस व महिला काँग्रेसतर्फे मकरसंक्रांती सण उत्साहात साजरा करण्यात आला.

जिल्हा काँग्रेस व महिला काँग्रेसतर्फे मकरसंक्रांती सण उत्साहात
भुसावळ : शहरातील राजीव गांधी वाचनालयात सर्वधर्मसमभावाची भावना जोपासत राष्ट्रीय एकात्मता या तत्वावर तिळगुळ घ्या गोड गोड बोला (मकर संक्रांत) हा सण गुरुवारी उत्साहात साजरा करण्यात आला व एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष मो. मुन्वरखान, जिल्हा उपाध्यक्ष जे.बी.कोटेचा, शहराध्यक्ष सलीम गवळी, शहर सचिव प्रा.हमीद, इसहाक चौधरी, शेख इमरान, रमजान खाटीक, जॉनी गवळी, अकिल शहा, माजी आमदार नीळकंठ फालक, महिला अध्यक्षा हमिदा गवळी, सुमनबाई सावळे, यास्मिन कुरेशी, यास्मिन बी शेख, युसुफ सायरा बानो, मेहरून बानो, समीन कुरेशी, शीलाइंदर परदेशी, डॉ.सुवर्णा गाडेकर आदी हिंदू-मुस्लीम भगिनींनी सर्वांना तिळगुळ देऊन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.