शेतकरी हितासाठी देशात परिवर्तन करा - जळगाव जिल्ह्यात एरंडोल येथे शरद पवार यांचे गुलाबराव देवकर यांच्या प्रचार सभेत आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 12:31 AM2019-04-06T00:31:25+5:302019-04-06T00:33:53+5:30

शेतीमालाला भाव नाही, फसवी कर्जमाफी यामुळे गांजलेला शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी परिवर्तन करा, असे आवाहन राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शुक्रवारी सायंकाळी एरंडोल येथे आयोजित सभेत केले.

Make a change in the country for farmers' welfare - Sharad Pawar's call for Gulabrao Deokar rally in Jalgaon district | शेतकरी हितासाठी देशात परिवर्तन करा - जळगाव जिल्ह्यात एरंडोल येथे शरद पवार यांचे गुलाबराव देवकर यांच्या प्रचार सभेत आवाहन

शेतकरी हितासाठी देशात परिवर्तन करा - जळगाव जिल्ह्यात एरंडोल येथे शरद पवार यांचे गुलाबराव देवकर यांच्या प्रचार सभेत आवाहन

Next
ठळक मुद्देमोदी सरकारवर टीकास्त्रतीन राज्यात परिवर्तनशेतकऱ्यांची स्थिती बिकटआता कोणता गुन्हा दाखल करणार

एरंडोल, जि. जळगाव : शेतीमालाला भाव नाही, फसवी कर्जमाफी यामुळे गांजलेला शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी परिवर्तन करा, असे आवाहन राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शुक्रवारी सायंकाळी एरंडोल येथे आयोजित सभेत केले.
एरंडोल येथील महात्मा फुले शाळेच्या प्रांगणात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जळगाव लोकसभा मतदार संघातील उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारासाठी पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, माजी खासदार ईश्वरलाल जैन, उमेदवार गुलाबराव देवकर, आमदार डॉ. सतीश पाटील, राष्टÑवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, राष्टÑवादी कॉँग्रेस अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, माजी आमदार दिलीप वाघ, संतोष चौधरी, मनिष जैन, राजीव देशमुख, दिलीप सोनवणे, डी.जी. पाटील, संजय गरूड, जगन सोनवणे, युवक कॉँग्रेस महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, अनिल भाईदास पाटील, विलास भाऊलाल पाटील, मुकुंद सपकाळे, योगेश देसले आदींची उपस्थिती होती.
तीन राज्यात परिवर्तन
एरंडोल येथे वयाच्या २१व्या वर्षी प्रथम आल्याची आठवण सांगत, स्वातंत्र्य सेनानी सिताराम बिर्ला यांचे स्मरण शरद पवार यांनी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मोदींच्या राजवटीला जनता त्रासली आहे. परिणामी नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगडमध्ये भाजपचा शंभर टक्के पराभव झाला. आता वेळ लोकसभेची आहे.
देशात शेतीचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगताना पवार म्हणाले, मालाला भाव नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. आपण कृषीमंत्री असताना यवतमाळ येथे एका शेतकºयाने आत्महत्या केली त्यावेळी पंतप्रधान मनमोहनसिंह यांना बरोबर घेऊन गेलो होतो. तेथील परिस्थिती पाहून तात्काळ कर्जमाफीचा निर्णय घेतला. ७१ हजार कोटींची कर्जमाफी केली.
मुख्यमंत्री फडणवीस हे विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यावेळी ते म्हणत राज्यकर्त्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. आता दोन वर्षात ११ हजार ९९८ शेतकºयांनी आत्महत्या केल्या मग त्यांच्याविरूद्ध कोणता गुन्हा दाखल करावा? कांदा उत्पादक हैराण आहे. एका कांदा व्यापाºयाने उत्पादनाला भाव नाही म्हणून स्वत:ला कांद्यात गाडून घेतले. ही बाब लक्षात घेऊन शेतकरी हितासाठी परिवर्तन करावे, असे आवाहन त्यांनी केले. आमदार डॉ. सतीश पाटील, अ‍ॅड. संदीप पाटील, अरूणभाई गुजराथी, अनिल भाईदास पाटील, जगन सोनवणे, योगेश देसले, डॉ.राधेश्याम चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले.
भाजपच्या सर्वेक्षणात देवकर आघाडीवर
जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने दोन उमेदवार बदलल्याचा मुद्दा घेऊन आमदार डॉ.सतीश पाटील म्हणाले की, अर्ज भरण्याची मुदत संपली म्हणून बरे झाले. अन्यथा भाजपने आणखी एक-दोन उमेदवार बदलले असते. देवकर यांच्या उमेदवारीचा भाजपला धाक आहे. त्यांच्या सर्वेक्षणात देवकर यांना ६५ टक्के मते मिळण्याचा अंदाज आल्यानेच उमेदवार बदल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. पाडळसरे धरणावर बोलावे म्हणून मागणी होत होती.
म्हणे माझे बोट धरून आले...
एका कार्यक्रमात बरोबर असताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आपण शरद पवार यांचे बोट धरून राजकारणात आलो. मोदी नावाची ही भानगड मी राजकारणात आणली नाही. माझे बोट खराब करून का घ्यावे? असे पवार म्हणताच एकच हंशा पिकला.
पाडळसे धरणाला निधी दिला नाही- देवकर
अजित पवार हे पाटबंधारे मंत्री असताना अमळनेरसह नजीकच्या तालुक्यांसाठी महत्वाकांक्षी प्रकल्पास साडेचारशे कोटींचा निधी दिला. या सरकारने निधी न दिल्यानेच या प्रकल्पाचे काम रेंगाळल्याचे उमेदवार गुलाबराव देवकर यावेळी बोलताना म्हणाले. हीच स्थिती पद्मालय, वरखेडे तांडा, बलून बंधाºयांची आहे. विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपल्याला मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
‘चौकीदार चोर है’च्या घोषणा
शरद पवार हे राफेल खरेदीचा विषय मांडत असताना उपस्थित जनसमुदायाने ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या.
या प्रचारसभेसाठी जळगाव, पारोळा, एरंडोल, धरणगाव तालुक्यातील नागरिकांची उपस्थिती होती. तब्बल सव्वा तास उशीरा ही सभा सुरू झाली. त्यापूर्वी स्थानिक नेत्यांची भाषणे झाली.
पवार म्हणाले...
आम्ही केवळ कर्ज माफी नाही तर शेती कर्ज शून्य टक्के व्याजाने दिले.
गहू-तांदळाला चांगला भाव दिला. तसेच गरीबांना २ रूपये किलो भावाने गहू व तांदुळ दिले
शेती मालाला भाव न मिळाल्यास परदेशातून धान्य आणावे लागेल.
आमच्या काळात साखर, तांदुळ, कापूस निर्यात वाढली
राफेल विमानाची किंमत मनमोहनसिंह यांच्या काळात ३५० कोटी होती. मोदींनी ती १६६० कोटी केली
४देशासाठी पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी व आता सोनिया गांधी यांचे योगदान मोठे आहे. पण मोदी म्हणतात यांनी देशाचे वाटोळे केले.
पायलट अभिनंदन भारतात परतल्यावर मोदी म्हणतात आमची ५६ इंची छाती आहे. मग कुलभुषण जाधव यांच्या सुटकेसाठी ही छाती काय करते?
भाजपची सत्ता असतानाच कारगिल, अक्षरधाम मंदिर, अमरनाथ यात्रेवर हल्ला, गोध्रा हत्याकांड घडले. यांच्या मनगटात दम नाही हेच यातून सिद्ध होते.

Web Title: Make a change in the country for farmers' welfare - Sharad Pawar's call for Gulabrao Deokar rally in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.