मुलांना लाड कमिटीवर अवलंबून न ठेवता अधिकारी बनवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:13 AM2021-06-28T04:13:36+5:302021-06-28T04:13:36+5:30

डॉ. विद्या गायकवाड यांना अमळनेर पालिकेचा अतिरिक्त पदभार दिला असताना आता शासनाने कोपरगाव पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना अमळनेर ...

Make the children officers without relying on the pampering committee | मुलांना लाड कमिटीवर अवलंबून न ठेवता अधिकारी बनवा

मुलांना लाड कमिटीवर अवलंबून न ठेवता अधिकारी बनवा

Next

डॉ. विद्या गायकवाड यांना अमळनेर पालिकेचा अतिरिक्त पदभार दिला असताना आता शासनाने कोपरगाव पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना अमळनेर पालिकेत नियुक्ती दिल्याने डॉ. गायकवाड यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद आणि दोन्ही कामगार संघटनांच्यावतीने निरोप देऊन सत्कार करण्यात आला.

डॉ. आंबेडकर पतपेढीच्या सभागृहात नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नूतन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांची उपस्थिती असल्याने त्यांचे सर्व पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्याहस्ते स्वागत करण्यात आले तर मावळत्या मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांचा दोन्ही कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि डॉ. आंबेडकर परिषदेच्या वतीने साडीचोळी व मोठी फ्रेम देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

यानंतर मान्यवरांच्या हस्ते लाड कमिटीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष व नगरसेवक नरेंद्र संदानशिव यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. मंचावर नगरसेवक नरेंद्र संदानशिव, मनोज भाऊराव पाटील, शेखा मिस्तरी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, फयाज पठाण, सामाजिक कार्यकर्ते महेश पाटील, बाबू साळुंखे, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, न. प. कामगार संघटनेचे सहसचिव अविनाश संदानशिव, प्रशासन अधिकारी संजय चौधरी, आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, संतोष बिऱ्हाडे, अरविंद कदम, इंटक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद शर्मा, सहसचिव सोमचंद संदानशिव, सभा लिपिक महेश जोशी सारजे उपस्थित होते. सूत्रसंचालन सोमचंद संदानशिव यांनी तर आभार नरेंद्र संदानशिव यांनी मानले.

Web Title: Make the children officers without relying on the pampering committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.