मालापूर तीन दिवसांपासून पाण्याविना आणि अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:22 AM2021-08-24T04:22:13+5:302021-08-24T04:22:13+5:30
दि. २६ ऑगस्टपर्यंत या समस्या दूर न झाल्यास चोपडा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला. वीरवाडे येथील ...
दि. २६ ऑगस्टपर्यंत या समस्या दूर न झाल्यास चोपडा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला. वीरवाडे येथील माजी सरपंच व माजी सभापती आत्माराम माळके यांनी जवळपास पन्नास ते सत्तर आदिवासी बांधव सोबत घेऊन मोर्चा आणला.
याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, चार दिवसांपासून म्हणजेच दि. २०पासून मालापूर गावाचे पथदीप व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा थेट ट्रान्स्फाॅर्मरवरून बंद केला आहे. त्यामुळे चार दिवसांपासून पथदीप व पाणीपुरवठा बंद आहे. महाराष्ट्रात कुठेही जोडणी तोडण्यात येऊ नये, असा आदेश असतानाही मुद्दाम आदिवासी भागावर वीज वितरण कंपनीचे अधिकारी अन्याय करीत आहेत.
यापूर्वीही आदिवासी गावांची लाइन सतत बंद ठेवली जाते व पाणीपुरवठा आणि अन्य बाबतीत वीज वितरण कंपनीचे अधिकारी आदिवासी लोकांचा छळ करीत आहेत. त्यामुळे हा छळ थांबवावा, अन्यथा आदिवासी ग्रामस्थ त्यांच्या महिला, पत्नी, मुलाबाळांसह दिनांक २६ पासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करतील, असा इशाराही त्यांनी दिलेला आहे.
निवेदनावर पिंट्या पावरा, वसंत पावरा, संजय पावरा, वनवान्या पावरा, रेवसिंग पावरा, गुलाब पावरा, अशोक पावरा, दिलदार पावरा, नरसिंग पावरा, रंगीलाल बारेला, अन्वर सिंग बारेला, रमेश बारेला, जगन बारेला, धनसिंग बारेला, सायसिंग पावरा, खजान पावरा, वसंत पावरा, संजय पावरा, दिलीप पावरा, रेवसिंग पावरा, सूरसिंग पावरा, नादान बारेला, नानसिंग पावरा, बाळू पावरा, राजेंद्र पावरा, गंगाराम बारेला, सुनील बारेला, पायला पावरा, जामसिंग पावरा, विठ्ठल पावरा, बाळू पावरा, शिवदास पावरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
तहसीलदारांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब
मोर्चासदृश स्थिती पाहून व दिनांक २६ रोजी बेमुदत उपोषणाचा इशारा दिल्याने निवेदन घेतल्याबरोबर तत्काळ तहसीलदार अनिल गावीत यांनी ग्रामीण भागाचे सहाय्यक अभियंता रासकर यांना तहसील कार्यालयात बोलावून मालापूर गावातील समस्या काय आहेत. याबाबत जाणून घेतले व ही समस्या दूर करून तत्काळ वीजपुरवठा नियमित करावा, अशा सूचना दिल्या.
230821\20210823_114556.jpg
मालापुर तीन दिवसापासून पाण्याविना आणि अंधारात असल्याप्रकरणी आदिवासींचे तहसीलदार अनिल गावित यांना दिले निवेदन