धामणगाव आरोग्य केंद्रातर्फे हिवताप प्रतिरोध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:22 AM2021-06-16T04:22:05+5:302021-06-16T04:22:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने हिवताप प्रतिरोध महिना साजरा करण्यात येत असून, त्या अंतर्गत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने हिवताप प्रतिरोध महिना साजरा करण्यात येत असून, त्या अंतर्गत कार्यक्षेत्रात हिवताप व जलजन्य आजारांबाबत जनजागृती, टाक्या व जलदताप सर्वेक्षण, तसेच डासोत्पत्तीच्या ठिकाणी गप्पी मासे सोडणे, यांसारखे उपक्रम आरोग्यसेवक व आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत राबविले जात आहेत.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी. जमादार, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.अपर्णा पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय चव्हाण, तसेच धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विक्रम घोगले, डॉ.प्रतिभा बारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जून महिना एक दिवस एक कार्यक्रम, याप्रमाणे कार्यक्षेत्रातील ममुराबादसह परिसरातील गावात डासोत्पत्तीच्या ठिकाणी गप्पी मासे सोडण्याची मोहीम राबविण्यात आली. आरोग्यसेवक प्रकाश पाटील, घनश्याम लोखंडे, रमेश धनराळे, राहुल लाडवंजारी हे दैनंदिन कार्यक्रम राबवित आहेत, तर तालुका मलेरिया पर्यवेक्षक नरेंद्र सपकाळे व प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहायक एस.ए. महाजन पर्यवेक्षण करत आहेत.
---------
फोटो-
धामणगाव आरोग्य केंद्र व ममुराबाद उपकेंद्रांतर्गत डासोत्पत्तीच्या ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले.