ममुराबाद ग्रामपंचायतीच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:48 AM2021-01-08T04:48:20+5:302021-01-08T04:48:20+5:30
चुरशीच्या लढती : दोन माजी सरपंचांची उमेदवारी लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या ...
चुरशीच्या लढती : दोन माजी सरपंचांची उमेदवारी
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रिंगणात सुमारे ४३ उमेदवार राहिले आहेत. दोन माजी सरपंचांनी यंदा पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केले असून, बहुतांश वाॅर्डात चुरशीच्या लढती रंगण्याची शक्यता वाढली आहे.
गावात एकूण सहा वाॅर्ड आहेत. त्यातील वाॅर्ड क्रमांक एकमध्ये दोन जागांसाठी तर अन्य सर्व वाॅर्डात प्रत्येकी तीन जागांसाठी यंदा निवडणूक होत आहे. वाॅर्ड तीन व चारमध्ये प्रत्येकी १३ उमेदवारी अर्ज, वाॅर्ड एक तसेच दोनमध्ये प्रत्येकी ११ उमेदवारी अर्ज, त्याचप्रमाणे वाॅर्ड पाचमध्ये सहा व वाॅर्ड सहामध्ये नऊ, अशा प्रकारे ६३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. माघारीच्या शेवटच्या दिवशी सोमवारी त्यापैकी एकूण २० उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता ४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिले असून, त्यात माजी सरपंच हेमंत गोविंद चौधरी व अमर गंगाराम पाटील तसेच माजी उपसरपंच सुनीता अनंत चौधरी आदींचा समावेश आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अपेक्षेनुसार प्रत्येक वाॅर्डात दोन पॅनल तयार होऊन त्यांच्यात सरळ लढती रंगण्याची चिन्हे दिसून आली आहेत. त्याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.