ममुराबादचा तापी नदीवरील पाणी पुरवठा अखेर सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:12 AM2021-06-22T04:12:37+5:302021-06-22T04:12:37+5:30
ममुराबाद : नांद्रा खुर्द येथील तापी नदीवरील सामूहिक पाणी योजनेचा पंप कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे अचानक जळाल्यामुळे गावातील पाणी ...
ममुराबाद : नांद्रा खुर्द येथील तापी नदीवरील सामूहिक पाणी योजनेचा पंप कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे अचानक जळाल्यामुळे गावातील पाणी पुरवठा ठप्प झाला होता. ग्रामपंचायत प्रशासनाने पंप दुरुस्त केला असून, बंद पडलेला पाणी पुरवठा अखेर सुरळीत झाला आहे.
ममुराबाद गावासाठी नांद्रा खुर्द येथील सामूहिक योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था आहे. त्यासाठी पंपिंग सेंटरवर तीन ते चार पंपसुद्धा उपलब्ध आहेत. त्यातील एक पंप नादुरुस्त झाला म्हणजे दुसरा पंप लगेच कार्यान्वित करण्याची व्यवस्था त्याठिकाणी आहे. प्रत्यक्षात सततच्या कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे जास्त अश्वशक्तीचे पंप सुरळीतपणे चालत नसल्याने २५ अश्वशक्तीच्या एक पंपाच्या साहाय्याने वेळ निभावण्याचा प्रयत्न ममुराबाद ग्रामपंचायतीकडून काही दिवसांपासून सुरू आहे. त्यातही पुरेशा दाबाचा वीज पुरवठा होत नसल्याने जेमतेम सुरू असलेला एकमेव पंपही नुकताच जळाला. एकही पंप सुस्थितीत नसल्याच्या स्थितीत ममुराबादचा पाणी पुरवठा पूर्णतः ठप्प झाला. त्याबद्दल 'लोकमत'मध्येही वृत्त प्रकाशित झाले होते.