गावठी पिस्तूल बनवणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 11:29 PM2019-11-23T23:29:45+5:302019-11-23T23:30:32+5:30
आणखी १० ते १५ कट्टे मिळण्याची शक्यता । अमळनेर, जळगाव भुसावळात पिस्तूल विकल्याची माहिती
अमळनेर : शहरात गावठी पिस्तूल विकायला येताना पोलिसांच्या धाकाने अमळगाव- जळोड दरम्यान पुलाखाली ४० हजार रुपये किमतीचे २ गावठी पिस्तूल लपवणाऱ्या मध्यप्रदेशातील एका आरोपीला एलसीबी पोलिसांनी शनिवारी अटक केली.
विशेष म्हणजे, त्याच्याकडून अमळनेर, भुसावळ व जळगाव शहरात विकले गेलेले १० ते १५ पिस्तूल व आणखी आरोपी मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
गुरुचरण अवसिंग बर्नाला, रा. उमरटी, ता.वरला.जि. बडवानी याला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस निरीक्षक बी.जी.रोहम यांना मिळालेल्या माहितीवरून पोलीस कर्मचारी अशोक महाजन, नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, सुनील दामोदरे, मनोज दुसाने, प्रवीण हिवराळे, किरण धनगर, महेश पाटील, दीपक शिंदे यांच्या पथकान ही कारवाई केली. हे पथक ठरवलेल्या ठिकाणी पोहचताच पोलिसांना पाहिल्यावर संशयितरित्या पळत असताना त्यास चोपडा येथून २२ रोजी दुपारी १ वाजता ताब्यात घेतले. त्याला चौकशीसाठी जळगावला नेले असतात्याने २२ रोजी अमळनेर शहरात गावठी पिस्तूल विकायला जात असताना पोलीस आल्याची माहिती मिळताच अमळगाव पासून १ किमी अंतरावर जळोदकडे जाताना एका पुलाखाली पिस्तूल लपवून ठेवल्याची माहिती दिली. त्यावरून मारवड पोलीस स्टेशनचे विजय साळुंखे, सुनील आगवणे यांना घेऊन घटनास्थळावरून ४० हजारांचे दोन पिस्तूल ताब्यात घेतले असून मारवाड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक संतोष पवार करीत आहेत.
मोठे रॅकेट...
गुरुचरण सिंग हा आपल्या कुटुंबियांसोबत स्वत: गावठी पिस्तूल बनवतो आणि विकतो. त्याने अमळनेर, भुसावळ आणि जळगाव शहरात किमान १० ते १५ पिस्तूल विकल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.