महामार्गावर दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 01:28 PM2020-03-14T13:28:08+5:302020-03-14T13:28:35+5:30
जळगाव/ नशिराबाद : महामार्गावर कंत्राटदारांच्या कामासाठी आखलेल्या सीमेवर केलेल्या गतिरोधकाच्या आकाराच्या मातीच्या भरावावरुन दुचाकी आदळल्याने शेख सिद्दीकी शेख हसन ...
जळगाव/ नशिराबाद : महामार्गावर कंत्राटदारांच्या कामासाठी आखलेल्या सीमेवर केलेल्या गतिरोधकाच्या आकाराच्या मातीच्या भरावावरुन दुचाकी आदळल्याने शेख सिद्दीकी शेख हसन मन्यार (३६, रा. नशिराबाद) हा तरुण जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री १२ वाजता राष्टÑीय महामार्गावर तरसोद फाट्यानजीक घडली. दरम्यान, या अपघाताला कंत्राटदार व ‘नही’चे अधिकारी जबाबदार असून त्यांच्याविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा म्हणून नशिराबादकरांनी शुक्रवारी सकाळी घटनास्थळावर ठिय्या मांडून महामार्ग रोखला होता. दुपारी नशिराबाद पोलिसांना निवेदन देण्यात आले.
महामार्गाचे काम वेगवेगळ्या टप्प्यात व कंत्राटदारांमार्फत सुरु आहे. तरसोद फाट्याजवळ एका कंत्राटदराची हद्द संपून दुसऱ्या कंत्राटदाराची हद्द सुरु होते. त्यासाठी सीमा आखण्यात आली आहे. जेथे सीमा आखण्यात आली तेथे १३ इंच उंच मातीचा भराव महामार्गावर करण्यात आला आहे. हाच भराव सिद्दीकीच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. महामार्गावर हा भराव नसता तर अपघातच झाला नसता, म्हणून नागरिकांनी ‘नही’ च्या अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरुन प्रकल्प संचालक सी.एम.सिन्हा यांना घटनास्थळी बोलवा, आणखी किती जणांचा बळी घेणार?, आम्ही महामार्गावरुन मृतदेहच उचलण्याचे काम करायचे का? आताच सिन्हांविरुध्द गुन्हा दाखल करावा म्हणून महामार्गावर ठिय्या मांडून नागरिकांनी आंदोलन केले.
सविस्तर / हॅलो १ वर