चुंचाळे फाट्याजवळील अपघातात जळगावचा एक जण ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 01:57 AM2020-09-02T01:57:45+5:302020-09-02T01:58:25+5:30
मुकेश सोनार व रमेश सोनार हे दोघे जण एमएच-१९-सीक्यू-२९९० क्रमांकाच्या मोटारसायकलने यावलकडे येत होते. याच दरम्यान यावलहून किनगावकडे भरधाव वेगात जाणाऱ्या एमएच-१९-४१०० क्रमांकाच्या ट्रकने दुचाकीलाजोरदार धडक दिली.
यावल (जि. जळगाव) : तालुक्यात यावल-चोपडा रस्त्यावर चुंचाळे फाट्याजवळ झालेल्या अपघातातजळगाव येथील मयूर कॉलनीतील मुकेश लोटन सोनार (वय ४९) हे जागीच ठार झाले, तर त्यांच्यासोबत असलेले रमेश बळीराम सोनार (वय ३६, रा.रेणुकानगर, मेहरुण, जळगाव) हे जखमी झाले आहेत. सोमवारी सकाळी दहाला हा अपघात झाला.
सूत्रांनुसार, मुकेश सोनार व रमेश सोनार हे दोघे जण एमएच-१९-सीक्यू-२९९० क्रमांकाच्या मोटारसायकलने यावलकडे येत होते. याच दरम्यान यावलहून किनगावकडे भरधाव वेगात जाणाऱ्या एमएच-१९-४१०० क्रमांकाच्या ट्रकने दुचाकीलाजोरदार धडक दिली. त्यात मुकेश सोनार हे जागीच ठार झाले, तर सोबत असलेले मुकेश सोनार हे जखमी झाले. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. काहींनी तातडीने मदतीसाठी धावपळ सुरू केली. दोघांना प्रारंभी जळगाव येथे हलविण्यात आले.
रमेश यांच्या मृतदेहाचे यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. जखमीवर यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी जळगाव येथे रवाना करण्यात आले. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळाचा पंचनामादेखील करण्यात आला.
ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा
ट्रकचालक शेख सलीम अब्दुल्ला याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई-वडील असा परिवार आहे. घटनास्थळी यावल येथील सोनार समाजाचे अध्यक्ष नितीन सोनार यांची तातडीची मदतीसाठी धावून आले होते. घटनेचे वृत्त जळगाव येथे कळताच मृतांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला . मयुर कॉलनीतील मयताच्या घराजवळ एकच गर्दी झाली होती. नातेवाईकांची समजूत काही जण घालत होते.