मनोरूग्णाने केली सहा वर्षाच्या बालकाची विहीरीत फेकून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 03:13 PM2017-08-25T15:13:41+5:302017-08-25T15:19:14+5:30
मोहळाई येथील घटना
नगरदेवळा ता.पाचोरा- सात कि.मी अंतरावर असलेल्या मोहळाई (ता. सोयगाव) येथे 24 रोजी सायंकाळी रूपेश मलीराम गढरी (वय 6) वर्षी या पहिलीत शिकणा:या बालकास भाऊबंदकीतीलच चुलत काका ऋषीकेश दिपक गढरी (वय 18) या मनोरूग्णाने विहिरीत फेकून त्याची हत्या केली. या घटनेमुळे मोहळाई गाव सुन्न झाले आहे .
खालचे व वरचे अशा दोन भागात मोहळाई हे गाव विभागले गेले असून एक पाचोरा तालूक्यात तर दुसरे सोयगाव तालूक्यात येते त्यातील सोयगाव तालूक्यातील मोहळाई येथे ही घटना घडली. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ऋषीकेश याने रुपेशला गावातून सोबत नेताना गावातील महिलांनी पाहिले होते. नंतर काही वेळाने ही घटना उघडकीस आली.
दरम्यान आरोपी हा रात्री आठ वाजेपयर्ंत नगरदेवळा बाजारपेठेत फिरत असल्याचे अनेकानी पाहिले व नंतर बांबरूड(महादेव) गावाजवळ पोलीसांनी त्यास पकडले. बालकाचे पाचोरा येथे शवविच्छेदन करून अंत्यविधी करण्यात आला.सदर घटनेबाबत पाचोरा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटना दोन तालक्याशी संबंधीत असल्याने मोहळाई येथे बनोटी औटपोष्टचे फौजदार जागडे व नगरदेवळा औटपोष्टचे फौजदार प्रकाश पाटील आपापल्या ताफ्यासह हजर झाले. पाचोरा येथील पोलीस निरीक्षक श्यामकांत सोमवंशी यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील,गणेश शिंदे, नरेंद्र विसपुते आदी तर सोयगाव तालुक्यातून बनोटी पोलीस पुढील तपास करीत आहेत.