तीन वर्षानी खळखळला मन्याड कालवा

By Admin | Published: January 9, 2017 12:53 AM2017-01-09T00:53:25+5:302017-01-09T00:53:25+5:30

शेतक:यात समाधान : रब्बीच्या पिकांना होणार फायदा, शेतांमध्ये आले कामांना उधाण

Manad canal for three years | तीन वर्षानी खळखळला मन्याड कालवा

तीन वर्षानी खळखळला मन्याड कालवा

googlenewsNext

आडगाव, ता.चाळीसगाव : यंदा मन्याड धरण 100 टक्के भरल्याने अखेर तीन वर्षानी मन्याडचे कालवे आवर्तन सुटल्याने खळाळताना दिसत आहे.
मन्याड  परिसर तीन वर्षापासून पाटाचे पाण्यापासून वंचित होता. लागोपाठ तनी वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीला तोंड देत 2013 नंतर  निसर्गाच्या कृपेने 2016 मध्ये ऑक्टोबर महिन्यात मन्याड धरण 100 टक्के भरल्याने परिसरातील शेतक:यांच्या आशा  पल्लवित झाल्या. गतवर्षी भीषण दुष्काळामुळे परिसरातील शेतकरी, शेतमजूर, पशूपालक बेजार झाला होता.  निसर्गाने मात्र साथ दिल्याने शेतक:यांच्या आशा पल्लवित झाल्या.
असा वाहतो पाण्याचा प्रवाह
मन्याड धरण 100 टक्के भरल्यावर रब्बी हंगामासाठी  त्याचा चांगला उपयोग होतो. खरीप पिकाने धोका दिल्यास रब्बी हंगाम तारतो हा आजपावेतोचा शेतक:यांचा अनुभव आहे. मन्याड धरणातून  पाणी सोडल्यावर त्याचे दोन भागात  विभाजन केले जाते. चारी क्र. 1 ते 6 याचा एक भाग व 6 ते 12 याचा दुसरा भाग. त्यामुळे प्रथम एका सेक्शनला पाणी सोडण्यात येते.   धरणावरील विसंबून असणा:या 22  पैकी 11 ते 12 खेडय़ांचा पहिला एक टप्पा व उर्वरित खेडय़ांचा दुसरा टप्पा.  अशा रितीने पाटबंधारे विभागाकडून पाण्याचे नियोजन केले जाते. यात सेक्शन 1 ते 6 साठी स्थापत्य अभियांत्रिकी सहायक म्हणून  एस.बी. पाटील यांच्या अधिपत्याखाली काम होते तर दुस:या टप्प्यात 6 ते 12 सेक्शनसाठी सी.एन.पाटील हे कामकाज पाहतात. धरणातून पाणी सोडल्यावर नांद्रे, अलवाडी, देशमुखवाडी, ब्राrाणशेवगे, पिंप्री, शिरसगाव, तळोदा, टाकळी, आडगाव, चिंचखेडे, देवळी, डोणदिगर, उंबरखेड गावाचा एका टप्प्यात समावेश होतो. सद्य:स्थितीत चारी क्रमांक 10 व 11 पाणी सोडण्यात आले आहे.
रब्बी हंगाम  हुकल्याने नाराजी
धरण भरुन यावर्षी प्रथमच जानेवारीत पाणी मिळत असल्याने रब्बीचा हंगाम गहू, हरबरा, भुईमूग घेण्यापासून शेतकरी मुकला. याला कारण म्हणजे  पाटबंधारे विभागासह शेतकरीही तेवढेच जबाबदार आहेत. कारण पाटबंधारे विभागाने  चा:या लवकर दुरुस्त केल्या नाही म्हणून पाणी लांबले. शेतक:यांनीही अधिकाधिक पाणी अर्ज भरले नाही व स्वत:च्या पाटचा:या दुरुस्त केल्या नाही म्हणूनच शेतकरी रब्बी हंगामापासून वंचित राहिला. (वार्ताहर)
पाटचारी दुरुस्ती झाली युध्दपातळीवर
‘लोकमत’ने मन्याडचे आवर्तन लांबणीवर असे वृत्त प्रकाशित करताच या वृत्ताची  पाटबंधारे विभगाने  दखल घेत युध्द पातळीवर चा:यांची दुरुस्तीचे काम हाती घेतले. चा:यांची दुरुस्ती हाती घेतल्याने पहिल्या किंवा दुस:या आठवडय़ात पाणी मिळणार असाही अंदाज वर्तविला होता. आणि  पाटबंधारे विभागाने  दिवस-रात्र एक करून पहिल्या आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी धरणाचे गेट उघडले. यासाठी  प्र. शाखाधिकारी, हेमंत पाटील, जे.डब्ल्यू. सूर्यवंशी, एस.बी.पाटील, सी.एन.पाटील व  कर्मचा:यांनी परिश्रम घेतले.
असा होणार लाभ
सध्या चारी क्र.10 व 11 ला पाणी सोडण्यात आले असून 6 रोजी सायंकाळी 6 वाजता धरणातून पाणी सोडण्यात आले. ते दुस:या दिवशी म्हणजे  7 रोजी सायंकाळी 6 वाजता आडगाव शिवारात पोहचले. कपाशीला पाणी भरुन फरदड घेण्याच्या तयारीत शेतकरी आहे तर काही शेतकरी उन्हाळी बाजरी घेण्याच्या तयारीत आहेत. पाणी सुटल्यामुळे सध्या शेता शेतांमध्ये शेतकरी कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Manad canal for three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.