मन्याड धरण निम्मेच भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 05:29 PM2019-10-13T17:29:34+5:302019-10-13T17:31:46+5:30

‘मन्याड’ परिसरातील २२ गावांचे जलसंकट मोचक असलेले मन्याड धरण यावर्षी निम्मेच भरले आहे.

Manad Dam is half full | मन्याड धरण निम्मेच भरले

मन्याड धरण निम्मेच भरले

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकऱ्यांनी सहकार्य केल्यास ऐक आवर्तन शक्यपाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणारआठ वर्षात फक्त दोनदा मन्याड धरण भरले १०० टक्केतीन वर्षामध्ये पन्नाशी तर दोन वर्षामध्ये १२ ते १८ टक्के भरलेगेल्या वर्षी शून्याच्याही खाली

विजय पाटील
आडगाव, ता.चाळीसगाव, जि.जळगाव : ‘मन्याड’ परिसरातील २२ गावांचे जलसंकट मोचक असलेले मन्याड धरण यावर्षी निम्मेच भरले आहे. यामुळे परिसरातील गावांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र आहे. तसेच पाहिजे त्या प्रमाणात खरीप हंगामही घेता येणार नाही. परिसरातील शेतकरी यावर्षी चांगली आशा बाळगून होता. परंतु त्याच्या आशेवर संपूर्ण पाणी फिरल्याने खरीपावरच त्याला समाधान मानावे लागणार आहे.
एका महिन्यातच धरण ५० टक्के
पावसाळा जरी चार महिन्यांचा असला तरी तो कुठे कधी व किती होईल हे कुणालाही सांगता येत नाही. याचा प्रत्यय यावर्षी जवळजवळ सर्वांनाच आला. सगळीकडे पाऊसच पाऊस नदी, नाले, धरणे तुडूंब भरून वाहू लागले तर काही ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होऊ लागली. याला अपवाद ठरला तो मन्याड परिसर. पावसाळा सुरू झाल्यापासून एकसारखा निसर्गाकडे आस लावून बसलेला शेतकरी पोळ्यापर्यंत परिसरावर कुठेही उपयुक्त साठा हा जवळजवळ ५० टक्क्यांच्या आसपास आहे. शेतकऱ्यांनी सहकार्य केल्यास व पाणी काटकसरीने वापरल्यास एक आवर्तन चारा पिकासाठी व पिण्यासाठी देणे शक्य होईल, असे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. परतीचा पाऊस धरण परिसरात झाल्यास धरण १०० टक्के भरल्यास दोन/तीन आवर्तन देण्यास कुठलीही अडचण राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

मन्याड धरणाची क्षमता १९०५ द.ल.घ.फु.आहे. यातील मृत साठा ४८३ द.ल.घ.फु. आहे. या धरणाचे बुडीत क्षेत्र २१७७ एकर म्हणजे ८७१ हेक्टर त्यापैकी ४०० हेक्टर क्षेत्र हे लिफ्टवर भिजते आणि ६५०० हेक्टरात खरीप व रब्बी हंगाम निघतो.

कोणत्या वर्षी धरण किती टक्के भरले
सन २०१२-१३ मध्ये १२ टक्के
सन २०१३-१४ मध्ये १०० टक्के
सन २०१४-१५ मध्ये ४९ टक्के
सन २०१५-१६ मध्ये १८ टक्के
सन २०१६-१७ मध्ये १०० टक्के
सन २०१७-१८ मध्ये ६३ टक्के
सन २०१८-१९ मध्ये शून्य टक्के
सन २०१९-२० मध्ये ५० टक्के

Web Title: Manad Dam is half full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.