मेहरूण तलावात जाणाऱ्या सांडपाण्याचा बंदोबस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:19 AM2021-02-25T04:19:59+5:302021-02-25T04:19:59+5:30
जळगाव - शहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलावात परिसरातील सांडपाणी सोडले जात असल्याने तलावाचे पाणी प्रदुषित होत आहे. यामुळे तलावातील ...
जळगाव - शहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलावात परिसरातील सांडपाणी सोडले जात असल्याने तलावाचे पाणी प्रदुषित होत आहे. यामुळे तलावातील जैवविविधता धोक्यात आली आहे. यासह तलावात जलपर्णी देखील मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्यावरही उपाययोजना करण्याची मागणी योगी संस्थेने केली आहे. याबाबत योगी च्या सदस्यांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे. यावेळी योगेश्वर जोशी, पुर्वा जाधव, महेश शिंपी, प्रणीलसिंह चौधरी आदी उपस्थित होते.
पांडे चौक ते नेरी नाकादरम्यान अंधाराचे साम्राज्य
जळगाव - शहरातील पांडे चौक ते नेरी नाका दरम्यानच्या रस्त्याची वाट लागली आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. त्यातच या रस्त्यादरम्यान रात्रीच्या वेळेस पथदिवे देखील बंद असल्याने या भागात अंधाराचे साम्राज्य पसरेलेले असते. यामुळे प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
एसएमआयटी महाविद्यालयाकडील रस्त्याची दुरुस्ती करा
जळगाव - शहरातील बजरंग बोगद्याकडून एसएमआयटी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाली आहे. याला गेल्या दिड वर्षापासून सुरू असलेल्या नाल्याचे प्रलबंत काम कारणीभुत ठरत आहे. पाण्यचा निचरा न होणे, रस्त्यांवरील खड्डे न बुजवण्याची मुख्य समस्या असून धुळीमुळे होणारा त्रासाची त्यात भर पडली आहे. मनपाने या समस्या तातडीने न सोडविल्यास परिसरातील नागरीक आंदोलन करतील असा इशारा निवेदनाव्दारे आयुक्तांना दिला आहे. याबाबत डॉ.निलेश पाटील व परिसरातील नागरीकांनी आयुक्त सतीश कुलकर्णी यांना निवेदन देऊन समस्यांचा पाढा वाचला.
मनपाची परवानगी न घेताच बेकायदेशीरित्या जागेवर बांधकाम
जळगाव - शहरातील राजकमल टॉकीज रोडलगत सीटी सर्व्हे क्रमांक १८५३,१८५४ या मिळकतीमधील तळमजल्यावरील गच्चीवर अनिल
अग्रवाल व सुनील अग्रवाल यांनी बेकायदेशीरित्या १८९० फुट जागेत मनपाची कुठलीही परवानगी न घेताच पत्र्याचे शेड बांधले आहे.
मनपाकडे याबाबत अनेक तक्रारी करून देखील कोणतीही कारवाई करण्यात न आल्याची माहिती जगदिश अग्रवाल यांनी दिली असून,
याबाबतीत अग्रवाल यांनी मनपा आयुक्तांकडे तक्रार केली आहे. शहरातील इतर अतिक्रमणांप्रमाणे या अतिक्रमणांवरही कारवाई करण्याची
मागणी जगदिश अग्रवाल यांनी केली आहे.