‘मानस’ ने वाजणार जळगावात पुरुषोत्तम करंडकाची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 06:55 PM2017-09-09T18:55:58+5:302017-09-09T19:01:54+5:30

मू.जे.महाविद्यालयाचानाट्यशास्त्र विभाग व पुणेयेथीलमहाराष्टÑीय कलोपासक मंडलयांच्या संयुक्त विद्यमाने १६ ते  १८ सप्टेंबर दरम्यान शहरातील ला.ना.सार्वजनिकविद्यालयातीलभैय्यासाहेब गंधे सभागृहात ‘पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकीका’ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

'Manas' will be playing in jalgaon Purushottam Trophy Hour | ‘मानस’ ने वाजणार जळगावात पुरुषोत्तम करंडकाची घंटा

‘मानस’ ने वाजणार जळगावात पुरुषोत्तम करंडकाची घंटा

Next
ठळक मुद्दे१६ ते १८ सप्टेंबर दरम्यान आयोजनखान्देशसह मराठवाड्यातील १५ एकांकीका होणार सादरमू.जे.महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाने या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी

लोकमत आॅनलाईन,

जळगाव-दि.९, मू.जे.महाविद्यालयाचानाट्यशास्त्र विभाग व पुणेयेथीलमहाराष्टÑीय कलोपासक मंडलयांच्या संयुक्त विद्यमाने १६ ते  १८ सप्टेंबर दरम्यान शहरातील ला.ना.सार्वजनिकविद्यालयातील भैय्यासाहेब गंधे सभागृहात ‘पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकीका’ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या  स्पर्धेसाठी शनिवारी लॉट्स पाडण्यात आले. गोदावरी इन्स्टीटयूट आॅफ मॅनेजमेंटच्या ‘मानस’ या  एकांकिकेने पुरुषोत्तम करंडकाची पहिली घंटा १६रोजीवाजणार आहे. यास्पर्धेतखान्देशसहमराठवाड्यातील१५एकांकीकासादरहोणारआहे.

गेल्या वर्षापासून  मू.जे.महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाने या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी घेतली असून, या स्पर्धेत जळगावयेथीलउत्तर महाराष्टÑ विद्यापीठ, औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गतयेणाºया महाविद्यालयांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेत १५ संघानी आपला  प्रवेश निश्चित केला आहे. शनिवारी मू.जे.महाविद्यालयात महाराष्टÑीय कलोपासक यांचे प्रतिनीधी राजेंद्र  नांगरे, केसीईचे सभासद शशिकांत वडोदकर, प्रा.चारुदत्त गोखले, मू.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांच्या उपस्थितीत  लॉट्स पाडण्यात आले. यावेळी स्पर्धेत सहभागी महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रतिनिधी आणि प्राध्यापक  उपस्थित होते. १६ सप्टेंबर रोजी  दुपारी ४ वाजता स्पर्धेचे उदघाटन होणार आहे. पहिल्या दिवशी चार एकांकिका सादर केल्या जाणार आहेत. तर १८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता स्पर्धेचा निकाल जाहीर  होणारआहे.

पुरुषोत्तम करंडकाचे वेळापत्रक
१६ सप्टेंबर 
महाविद्यालयाचे नाव  - एकांकिका - वेळ
गोदावरी इन्स्टीटयूट आॅफ मॅनेजमेंट रिसर्च, जळगाव - मानस - सायंकाळी ५ वाजता
केसीईचे आय.एम.आर.महाविद्यालय, जळगाव - स्टॅच्यूू - ६ वाजता
पंडित जवाहरलाल नेहरु समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर - अल्पविराम - रात्री७  वाजता
डॉ.जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव- च्या बही -रात्री ८ वाजता

१७  सप्टेंबर  
पी.के.कोटेचा महिला महाविद्यालय, भुसावळ  - पुरुष - सकाळी १० वाजता
उमवि समाजकार्य विभाग, जळगाव - कॅफे शुभमंगल - ११ वाजता
एम.डी.पालेशा  कॉमर्स कॉलेज, धुळे - ब्रेकअप के बाद - दुपारी १२  वाजता
गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव -  कबुल है - दुपारी २ वाजता
पु.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ -  एक्स -  ३ वाजता
प्रताप महाविद्यालय, अमळनेर - रावीपार - ४ वाजता
नॉर्थ महाराष्टÑ नॉलेज सिटी, बांभोरी - उंच माझा झोका ग.. - सायंकाळी ५ वाजता
शिवाजी विद्या प्रसारक कला,वाणिज्य महाविद्यालय, धुळे- पंचावन्न आणि  साठीतले प्यादे - ६ वाजता

१८ सप्टेंबर 
देवगिरी  महाविद्यालय, नाट्यशास्त्र विभाग, औरंगाबाद  - तिच्यासाठी वाट्टेल ते - दुपारी १२ वाजता
जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालय,  औरंगाबाद - गार्गी..अजुन जिवंत आहे - दुपारी ३ वाजता
शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद - नाटक - दुपारी ४ वाजता

Web Title: 'Manas' will be playing in jalgaon Purushottam Trophy Hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.