मांडळ प्रकरणात दोन्ही गटांतर्फे १९ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:12 AM2021-06-27T04:12:56+5:302021-06-27T04:12:56+5:30
सागर कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २५ रोजी दुपारी ३ वाजता नदीत पाइपलाइन बघायला गेलो असता, तेथे वाळू भरताना ...
सागर कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २५ रोजी दुपारी ३ वाजता नदीत पाइपलाइन बघायला गेलो असता, तेथे वाळू भरताना ट्रॅक्टर दिसले. मोबाइलमध्ये शूटिंग घेत असताना, ज्ञानेश्वर प्रकाश कोळी, राकेश वसंत कोळी, संदीप बापू कोळी, अमोल सुक्रम भोई, विकास सुभाष कोळी, योगेश हिलाल कोळी, सूरज राजेंद्र कोळी, भाऊसाहेब प्रकाश मगरे, समाधान वसंत कोळी, गोकुळ शिरसाठ, बबलू नामदेव बडगुजर यांनी आपल्यासह काका भाऊ यांना पावड्या, लाकडी दांडक्याने, काठ्यांनी डोक्यावर, पायावर मारहाण करून जखमी केले.
ज्ञानेश्वर प्रकाश कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अशोक कोळी यांचे ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडले होते. त्यांच्या मुलांनी आपल्यावर संशय घेतला होता व तू कशी वाळू भरतो, ते बघतो, अशी धमकी दिली. आपण २५ रोजी मित्रांसह नदीत ट्रॅक्टरमध्ये वाळू भरली, तेव्हा सागर अशोक कोळी, विशाल अशोक कोळी, सोनू कोळी, अजय संजय कोळी, भैय्या श्रीराम कोळी, संजय ढोमण कोळी, मका ढोमण कोळी, विनोद अशोक कोळी यांनी ट्रॅक्टर अडवून मला व मित्र याना डोक्यावर, पायावर, हाताच्या पंजावर पावडी, काठी मारून मारून जखमी केले.
दोन्ही गटांच्या १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल फुला, पोलीस उपनिरीक्षक वैभव पेठकर करीत आहेत.