पालिका कर्मचाऱ्यांना गणवेश सक्तीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 09:38 PM2020-08-28T21:38:37+5:302020-08-28T21:38:43+5:30
अन्यथा कामावर घेतले जाणार नाही
अमळनेर : सोमवार पासून नगरपालिकेचे अधिकारी , कर्मचारी गणवेश आणि ओळखपत्रशिवाय पालिकेत आल्यास त्यांना प्रवेश दिला जाणार नाही असे सक्त आदेश उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी काढले आहेत. दरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांना गणवेश सक्तीचा करणारी अमळनेर पालिका ही राज्यातील पहिली नगरपालिका असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
नगरपालिकेच्या कर्मचा?्यांना शिस्त लागावी , कामात सुरळीत पणा यावा , पालिकेचे कर्मचारी ओळखता यावे , काम सोडून बाहेर फिरणाºया कर्मचाºयांवर नियंत्रण मिळवता यावे आणि गतिमान प्रशासन करता यावे म्हणून नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, मुख्याधिकारी विद्या गायकवाड व उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी पालिकेच्या कर्मचाºयांना गणवेश आणि ओळखपत्र सक्तीचे केले आहे. ३१ आॅगस्ट पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
मुकादम आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्यासाठी पांढरा गणवेश तर वर्ग ३ व अधिकारी वगार्साठी आकाशी रंगाचा शर्ट तर महिला कर्मचाºयांसाठी साडी असा गणवेश ठेवण्यात आला आहे.