आंब्याचा मोहर बहरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 03:14 PM2020-11-30T15:14:16+5:302020-11-30T15:15:49+5:30
आंब्याचा मोहर आजच्या स्थितीत चांगला बहरला आहे.
ठळक मुद्देआंबा उत्पादकांच्या आशा पल्लवितहंगामाला होतेय सुरुवात
अ ोक परदेशीभडगाव : तालुक्यात आंब्याचा मोहर आजच्या स्थितीत चांगला बहरला आहे. यामुळे आंबा उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.तालुक्यात आंब्यांची मोठमोठी झाडे दिमाखात उभी आहेत. आंब्यांची चव गोड व आंबट अशी शेतकऱ्यांसह जनता आज चाखत आहे. आंब्यांचा हा गोडवा माणसाच्या मनात शिरतो. भडगाव। टोणगाव शिवारात नुकतेच या आंब्याच्या झाडांना आम्रमोहोर फुटला आहे. आम्रमोहोराने आंबा बहरत आहे. हा आंबा आहे टोणगाव शिवारातील संजय लालचंद बडजावत यांच्या शेतातील. भडगाव तालुक्यात प्रथमच हा आंबा आम्रमोहोराने बहरलेला दिसून आला. डिसेंबर महिन्यात सरत्या वर्षात आंब्यांच्या हंगामाला सलामी देण्यास निसर्गाची सुरुवात होते. तालुक्यात आता यापुढे आंब्यांना आम्रमोहोर फुटण्यास सुरुवात होईल. यावर्षी पाण्याची जमिनीत मुबलकता, नदी, कालव्यांना, काही नाल्यांना पाणी प्रवाहीत दिसत आहे. यावर्षी रब्बी हंगामही चांगला बहरणार आहे. त्यामुळे ज्यावर्षी गव्हासह रब्बी हंगाम चांगला येतो त्यावर्षी आंब्यांचा हंगाम चांगला उत्पादनाने आकारतो, असे शेतकऱ्यांचे अनुभवाचे बोल आहेत. आंब्याला आला चांगला आम्रमोहोराचा बहर अन् आंबा उत्पादकांच्या चांगल्या उत्पन्नाच्या उजळल्या, असे सध्या चित्र दिसत आहे. भडगाव तालुक्यात आंब्यांना आम्रमोहोर फुटण्यास सुरुवात झाली आहे. या आंब्यांचे आम्र मोहोर फुटल्याचे चित्र प्रथमच पहावयास मिळाले.