मंगरुळला मुलींचे स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र उभारणार- आय.जी. प्रतापराव दिघावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 12:01 PM2020-12-12T12:01:32+5:302020-12-12T12:04:52+5:30
मंगरूळ येथे स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र उभारण्यात येणार आहे.
अमळनेर : सध्याची युवा पिढी हातात मोबाईल घेऊन पारावर बसून अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कसा चुकतो यावर चर्चा करते. त्यामुळे ग्रामीण भागातील युवक अपयशी ठरतात. म्हणून ग्रामीण भागातील मुलींनीदेखील स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी मंगरूळ येथे मुलींचे स्पर्धा परीक्षा केंद्र आणि संगणक प्रयोगशाळा उभारणार असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रतापराव दिघावकर यांनी दिली
आय.जी डॉ.प्रतापराव दिघावकर हे जळगाव जिल्ह्यात पोलीस स्टेशनच्या तपासणीसाठी आले असता त्यांनी ११ रोजी मंगरूळ येथील ग्रामविकास शिक्षण मंडळास सदिच्छा भेट दिली. संस्थेच्या उच्च माध्यमिक विद्यालयास ‛डॉ.अस्मिता प्रतापराव दिघावकरह्ण असे नाव देण्यात आले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिघावकर पुढे म्हणाले, उच्च पदावर जाण्यासाठी पैशाची गरज नसते. वाचनाची आवश्यकता असते. मी फक्त १२०० रुपयात आय.जी. झालो आहे. सामान्य विद्यार्थी सतत दोन वर्षे अभ्यास करेल तर निश्चित यशस्वी होईल.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ.बी.एस. पाटील, ग. स.बँकेचे माजी चेअरमन झाम्बर राजाराम पाटील, संस्थेचे अध्यक्ष युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख श्रीकांत पाटील, सुहासिनी पाटील उपस्थित होते.
यावेळी शेतकी संघाचे माजी अध्यक्ष संजय पुनाजी पाटील, काँग्रेसचे तालुका प्रभारी बी. के. सूर्यवंशी यांनी काही शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर होऊनही विमा मिळत नसल्याची तक्रार केली.
माजी आमदार पाटील यांनीदेखील एका युवकाची बुडीत रक्कम मिळण्याविषयी तक्रार केली.
किरण पवार यांनी मठगवाण येथील सरपंचावरील अन्यायाबाबत तक्रार केली. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष शकील काझी, नगरसेवक प्रताप शिंपी, पातोंडयाचे महेंद्र पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे भूषण भदाणे, मुन्ना पवार, गोविंदा बाविस्कर, पोलीस पाटील, भागवत पाटील, जितेंद्र ठाकूर, मुन्ना शेख, विश्वास पाटील, योगेश पाटील, मुख्याध्यापक प्रकाश पाटील, अशोक सूर्यवंशी, प्रभुदास पाटील, राजेंद्र पाटील, शशिकांत पाटील, जितेंद्र पाटील, एस. बी. पाटील, श्रुती पाटील, सुषमा सोनवणे, सीमा मोरे, शीतल चव्हाण, प्रवीण पाटील, राहुल पाटील, मनोज पाटील, प्रदीप पाटील, योगेश जाधव, सुदर्शन पवार, संदीप पाटील, चंद्रशेखर पाटील उपस्थित होते.