सात वर्षात केवळ दोन वेळा भरले मन्याड धरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:05 PM2018-11-19T22:05:41+5:302018-11-19T22:07:18+5:30
आडगाव,ता. चाळीसगाव : प्रत्येक वर्षी कमी होत असलेल्या पर्जन्यमानामुळे मन्याड धरणाचा उतरता आलेख ही परीसरातील शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरत ...
आडगाव,ता.चाळीसगाव : प्रत्येक वर्षी कमी होत असलेल्या पर्जन्यमानामुळे मन्याड धरणाचा उतरता आलेख ही परीसरातील शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. गेल्या सात वर्षात फक्त दोनदाच धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे ही बाब परीसरातील शेतकºयांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
मन्याड परिसरात खरीप व रब्बीचे हंगाम चांगले होत असतात. मात्र गेल्या सात वर्षात परीसरातील शेतकरी दुष्काळीस्थितीत सापडल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे. यावर्षी खरीप व रब्बी या दोन्ही हंगामांना शेतकºयांना मुकावे लागत आहे.
चारा व पाण्याचा प्रश्न बिकट
मन्याड परिसरातील बहुतेक विहीरींनी तळ गाठल्याने गुराढोरांसाठी पाणी कुठून उपलब्ध करावे हा विचार सध्या परीसरातील शेतकºयांना सतावत आहे. सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने टंचाईची झळ कमी असली तरी उन्हाळ्यात कसे होईल याचा विचार आतापासूनच शेतकरी करीत आहेत.
चाºयाअभावी कपाशी व बांडीचे वैरण
शेतकºयांनी महागडा चारा मका, कडबा, सोयाबीनची कुट्टी साठवून ठेवली आहे. आगामी आठ ते दहा महिने चारा पुरवायचा म्हणून बहुतेक शेतकरी कपाशी उपटून एक वेळचे वैरण म्हणून खाऊ घालत आहेत. काही शेतकरी कपाशीची कुट्टी करून खाऊ घालत आहेत. काही शेतकरी शंभर रुपए शेकडा प्रमाणे उसाची बांडी विकत घेत आहेत.
गिरणा व मन्याड नदीजोड प्रकल्प गरजेचा
मन्याड परिसरातील शेतकºयांसाठी मन्याड धरण व्यतिरीक्त कुठलेही जलस्रोत नाही. स्व.रामराव जिभाऊंनी मन्याड धरणाची निर्मिती केली. बेलगंगा साखर कारखान्याची निर्मिती केली. जिभाऊ नंतर एकही लोतप्रतिनिधींनी जलस्रोत वाढविण्यासाठी प्रयत्न केले नाही. गिरणा/मन्याड नदीजोड प्रकल्प हा राबवला असता तर आज मन्याड परिसराची परिस्थिती वेगळी असती.