भुसावळातील उद्योगपती मनोज बियाणींना ९० लाखांत फसवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 08:40 PM2018-09-16T20:40:46+5:302018-09-16T21:48:04+5:30

अकोल्यातील उद्योगपती विवेक पारस्करसह ब्रोकर उमेश राठीविरुद्ध गुन्हा दाखल

Manoj Biyani, a Bhusaval industrialist, has been cheated in the 90 lakhs | भुसावळातील उद्योगपती मनोज बियाणींना ९० लाखांत फसवले

भुसावळातील उद्योगपती मनोज बियाणींना ९० लाखांत फसवले

googlenewsNext
ठळक मुद्देशेतजमीन अस्तित्वात नसताना बनावट कागदपत्रांद्वारे शेतजमीन विकण्याचा प्रयत्न२०१५ साली झाला होता व्यवहारखरेदी करण्यास टाळाटाळमुळे प्रकार झाला उघड

भुसावळ, जि.जळगाव : शेतजमीन अस्तित्वात नसताना बनावट कागदपत्रे सादर करून भुसावळ येथील प्रसिद्ध उद्योगपती तथा नगरसेवक मनोज बियाणी यांना ९० लाख रुपयांत फसवल्याची घटना घडली. या प्रकरणी अकोला येथील उद्योगपती तथा संशयित आरोपी विवेक रामराव पारस्कर (रा.तोष्णिवा ले आऊट, अकोला) व प्रॉपर्टी ब्रोकर उमेश कन्हैयालाल राठी (साई सदन, रणपिसे नगर, अकोला) यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
भुसावळ तालुक्यातील खडका येथे शेतजमीन गट क्रमांक १६८/१६९ चे कागदपत्र तयार करून २६ लाख एक हजार रुपये किमतीत सौदा करून ईसार पावतीवर खरेदी करून देण्याचा प्रयत्न आरोपी पारसकर व ब्रोकर राठी यांनी केला. हा व्यवहार २०१५ साली करण्यात आला होता. यावेळी बियाणी यांनी संशयित आरोपींंना पैसे दिले होते. मात्र संशयित दोन्ही आरोपी खरेदीसाठी येत नव्हते. त्यामुळे बियाणी यांनी त्यांच्याकडे जाऊन चौकशी केली, मात्र खरेदी करण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे बियाणी यांचा संशय बळावला.
फसवणूक अशी झाली उघड
संशयित जमीन आपल्या नावावर करून देत नसल्याने आपला संशय बळावल्यानंतर २७ जुलै बियाणी यांनी खडका तलाठी कार्यालयात जावून शेत गट क्रमांक १६८-१६९ यांचे उतारे मिळण्याबाबत अर्ज दिला. त्यानंतर सर्वे नंबर १ ते १३७ असल्याचा दाखला मिळाला व त्यावेळी शेतजमीन सर्वे क्रमांक १६८ ही अस्तित्वात नसताना बनावट उताऱ्यावर कागदपत्रे बनवून ती असित्वात असल्याचे दाखवून आपली आरोपींनी फसवणूक केल्याचे उघड झाले. आरोपींनी बनावट सही, शिक्क्यांद्वारे शेतजमिनीच्या ईसाºया पावतीपोटी ९० लाखांची रक्कम हडपली.
संपूर्ण कुटुंब संपवण्याची धमकी
बियाणी यांनी पैशांची मागणी केल्यानंतर आरोपीने माझ्यावर सिव्हिल लाईन, अकोल्यात पाच गुन्हे दाखल आहेत, माझ्याकडे गुंड लोक आहेत, तुमच्या कुटुंबाला संपवू, अशी धमकीदेखील दिल्याचे बियाणी यांनी तक्रारीत नमूद केले असून, पोलीस माझे करू शकत नाही, असेही आरोपींनी म्हटल्याचे नमूद आहे. तपास पोलीस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक देवीदास पवार करीत आह.



 

Web Title: Manoj Biyani, a Bhusaval industrialist, has been cheated in the 90 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.