मानराज पार्कनजीक खडीच्या डंपरची कारला धडक
By admin | Published: January 20, 2017 12:41 AM2017-01-20T00:41:47+5:302017-01-20T00:41:47+5:30
अपघातामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प : नायगाव येथील कुटुंब बचावले
जळगाव : ट्रेलरच्या धडकेत डॉक्टरपूत्राचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता ओव्हरटेक करणा:या कारवर खडी वाहतूक करणारा डंपर आदळला. यात चालकाच्या प्रसंगावधानामुळे कार पलटी होता होता बचावली, त्यामुळे कारमधील चौघे बालंबाल बचावले. हा अपघात म्हणजे कारमधील चौघांसाठी ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ असाच होता. मानराज पार्कजवळ हा अपघात झाला.
शिव कॉलनीजवळ 16 जानेवारी रोजी द्रौपदी नगरातील डॉ.पी.के.पाटील यांच्या कुंदन या एकुलत्या मुलाचा ट्रेलरच्या अपघातात मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी याच परिसरात पुन्हा हा अपघात झाला. नायगाव येथील सुधीर अरुण पाटील या तरुणाची प}ी कोमल जळगाव शहरातील दवाखान्यात प्रसुत झाली आहे. त्यामुळे सुधीरसह अमोल रमेश पाटील, शोभाबाई गोपाळ पाटील व वत्सलाबाई युवराज पाटील हे गुजराल पेट्रोलपंपाजवळ राहणा:या नातेवाईकांकडे आले होते. सकाळी तेथून जेवणाचा डबा घेवून हे चौघे जण कारने (क्र.एम.एच.19.सी.एफ.3160) दवाखान्यात जात असताना पुढे चालणा:या खडी भरलेल्या डंपर (क्र.एम.एच.19 ङोड 2703)ला चालक सुधीर याने मानराज पार्कसमोर ओव्हरटेक केला. डंपरचावेग वाढल्याने तो थेट कारवर आदळला. डंपर चालकाने पळ काढला. अनिल सोनवणे यांच्या मालकीच्या दादाश्री कन्स्ट्रक्शनचा हा डंपर होता.
20 ते 25 फुटार्पयत कारला डंपरने ओढत नेले. विरुध्द दिशेने कार फिरल्याने रस्त्याला लागून असलेल्या उतारवर चालकाने नियंत्रण मिळवले. त्यामुळे कार पलटी होता होता वाचली, अन्यथा कार पलटी होवून मोठी दुर्घटना घडली असती. या अपघातात कारचा डाव्या बाजूचा पत्रा कापला गेला आहे. सुदैवाने कारमधील कोणालाच दुखापत झाली नाही.
पुण्य आडवे आले..
हा अपघात म्हणजे ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’ असाच होता. परमेश्वराची कृपा म्हणून आम्ही सर्व जण बचावलो अशी प्रतिक्रीया व्यक्त करत सुधीर पाटील या चालकाने ‘लोकमत’ जवळ आपबिती कथन केली. आम्ही व कुटूंबाने केलेले पुण्य आडवे आले व परमेश्वराने वेळीच सावरण्याची शक्ती दिली..अन्यथा आज अनर्थ झाला असता, असेही सुधीर म्हणाला.