‘मोनुच्या मनात’ ने वाजणार बालराज्य नाट्य स्पर्धेची घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 12:39 PM2018-01-01T12:39:54+5:302018-01-01T12:42:37+5:30
महाराष्टÑ सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे १५ व्या बालराज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन ३ ते ६ जानेवारी दरम्यान ला.ना.शाळेच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात करण्यात आले आहे. ज्ञानेश्वर गायकवाड लिखीत ‘मोनुच्या मनात’ या नाटकाने स्पर्धेची घंटा वाजणार आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१-महाराष्टÑ सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे १५ व्या बालराज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन ३ ते ६ जानेवारी दरम्यान ला.ना.शाळेच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात करण्यात आले आहे. ज्ञानेश्वर गायकवाड लिखीत ‘मोनुच्या मनात’ या नाटकाने स्पर्धेची घंटा वाजणार आहे.
स्पर्धेचे उदघाटन ३ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता जि.प.माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी देवीदास महाजन व अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सदस्य श्रीपाद जोशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. जळगाव, भुसावळ, चाळीसगाव, अमळनेर व धुळे येथील २१ नाटकांचे सादरीकरण या स्पर्धेत होणार आहे.
असा आहे कार्यक्रम दिनांक - वेळ - लेखक - नाटक - संस्था
३ जानेवारी - दुपारी ४ - ज्ञानेश्वर गायकवाड - मोनुच्या मनात -अप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान, जळगाव
३ - सायंकाळी ५ - पु.ल.देशपांडे - वयम मोठम् खोटम- तात्याराव सामंत विद्यालय,चाळीसगाव
३ - सायंकाळी ६ - विजय ठाकरे - युगांतर,शोकांतीका ते यशोगाथा -पिंपळादेवी प्राथमिक विद्या मंदिर, धुळे
३ - सायंकाळी ७ - विनोद उबाळे - संस्काराची शिदोरी-अहिल्यादेवी कन्या विद्यालय, भुसावळ
३ - रात्री ८ - चंद्रकांत बोंडे - देव माणसा -शारदा माध्यमिक विद्यालय, भुसावळ
४ जानेवारी - दुपारी ४ - योगेश पाटील - दादा - विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम, जळगाव
४ - सायंकाळी ५ - विभावली मोराणकर - भुत - राज बहुउद्देशिय संस्था, जळगाव
४ - सायंकाळी ६ - योगेश पाटील - मी मलाला - ब.गो.शानभाग विद्यालय, सावखेडे
४ - सायंकाळी ७ - हनुमान सुरवसे - झपाटलेली चाळ - अनुभुती इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव
४ - रात्री ८ - अलका भटकर - टेकडीचे गुढ - महाराणा प्रताप विद्यालय, भुसावळ
५ जानेवारी - दुपारी ४ - समीर तडवी - मी पारंबी - काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल,जळगाव-
५ - सायंकाळी ५ - धनंजय सरदेशपांडे -एलियन्स द ग्रेट - महाराणा प्रताप शिक्षण प्रसारक मंडळ, धुळे
५ - सायंकाळी ६ - रेणुका भिडे - खेळ रंगी रंगुया - का.ऊ.कोल्हे विद्यालय, जळगाव
५ - सायंकाळी ७ - धनंजय धनगर व नुपुर पांडे - कमांड एच टु ओ - अहिल्यादेवी होळकर प्रगती मंडळ,जळगाव
५ - रात्री ८ - प्रदिप भोई - स्वप्नांच्या पलिकडे - गि.न.चांदसरकर बालमोहन शाळा, जळगाव
६ जानेवारी - दुपारी ३- योगेश पाटील - दादा - आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव
६ - दुपारी ४ - प्रदिप जंगम - एक राज्य अंध्याचं -प्राथमिक विद्यालय विजयवाडी, चाळीसगाव
६ - सायंकाळी ५ - किरण कुमार अडकमोल -एका होत आटपाट नगर -फ्लार्इंग बर्ड थिएटर, जळगाव
६ - सायंकाळी ६ - अमोल अरुण - पिकनिक - भगीरथ इंग्लिश स्कूल, जळगाव-
६ - सायंकाळी ७ - विशाल जाधव - शाळा पुस्तकांची - पी.एम.मुंदडे माध्यमिक विद्यालय, जळगाव
६ - रात्री ८ - अमोल अरुण- पुस्तक एके पुस्तक - अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ