जीएसटी’ ला विरोध म्हणून जळगावातील 110 दाल मील बंद

By admin | Published: June 30, 2017 11:07 AM2017-06-30T11:07:29+5:302017-06-30T11:07:29+5:30

डाळीवरील कर मागे घेण्याची मागणी

As many as 110 liters of mills in Jalgaon are closed for protest against GST | जीएसटी’ ला विरोध म्हणून जळगावातील 110 दाल मील बंद

जीएसटी’ ला विरोध म्हणून जळगावातील 110 दाल मील बंद

Next

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.30 - वस्तू व सेवा कर (जीएसटी) विरोधात 30 रोजी जळगाव जिल्हा दाल मील असोसिएशनचा बंद असून, शहरातील 110 दाल मील बंद राहणार आहेत. 
जीएसटीमध्ये ब्रॅण्डेड डाळींवर पाच टक्के कर लावला असून, हा कर मागे घेतला जावा म्हणून 30 रोजी एकदिवसीय बंद ठेवल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष प्रेम कोगटा यांनी दिली. 
जीएसटी अंतर्गत कुठल्या वस्तूची किती किंमत असेल याची सविस्तर यादी व्यापारी, उद्योजक यांना विक्रीकर विभागाने दिली आहे. संबंधित वस्तूवर जीएसटीमध्ये निर्धारित कर लावून त्याची विक्री 1 जुलैपासून करणे व्यापा:यांना बंधनकारक राहील, असे सहायक विक्री कर आयुक्त सुनील गोहिल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले
व्हॅटधारक 19 हजार व्यापारी जीएसटीमध्ये
यापूर्वीचे व्हॅट कायद्यात नोंदणी असलेले 19 हजार व्यापारी जीएसटीमध्ये समाविष्ट झाले आहेत.  या व्यतिरिक्त जे व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक यांच्या सेवा व वस्तू यांच्या विक्रीचा टप्पा (व्यवसाय) 20 लाख व त्यापेक्षा अधिक आहे त्यांना जीएसटीएन या संकेतस्थळावर आपल्या व्यवसायाची सविस्तर नोंदणी करायची आहे.  जीएसटीमध्ये नोंदणीसंबंधी व्यापारी, उद्योजक यांना मदत करण्यासाठी विक्री कर भवनात हेल्प डेस्क सुरू केला असून, या कक्षाद्वारे मोफत नोंदणीसाठी सहकार्य केले जाईल. दोन वरिष्ठ अधिकारी त्यासाठी नियुक्त केले आहेत. 
दाणा बाजार सुरळीत राहणार
जीएसटीबाबत दाणा बाजारातील व्यापा:यांमध्ये वस्तूंच्या यादी व त्यातील दर, कर याबाबत संभ्रम आहे. पण याविरोधात 30 रोजी दाणा बाजार बंद राहणार नाही.

Web Title: As many as 110 liters of mills in Jalgaon are closed for protest against GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.