फ्लिपकार्टच्या कार्यालयतून तब्बल १८ मोबाईल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:15 AM2021-03-20T04:15:39+5:302021-03-20T04:15:39+5:30

जळगाव : शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या फ्लिपकार्टच्या कार्यालयामधून मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी तीन लाख रुपये किमतीचे १८ मोबाईल लंपास केल्याची ...

As many as 18 mobile lamps from Flipkart's office | फ्लिपकार्टच्या कार्यालयतून तब्बल १८ मोबाईल लंपास

फ्लिपकार्टच्या कार्यालयतून तब्बल १८ मोबाईल लंपास

Next

जळगाव : शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या फ्लिपकार्टच्या कार्यालयामधून मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी तीन लाख रुपये किमतीचे १८ मोबाईल लंपास केल्याची घटना शुक्रवारी सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एमआयडीसीतील एम सेक्टरमध्ये १४७ मध्ये इंन्सटाकार्ड फ्लिपकार्ट कुरीयर सर्व्हीसेसचे ऑफिस आहे. त्याच्याशेजारी एक बंद गाळा असून त्याच्या समाईक भिंतीला एक दरवाजा असून त्याला आतून ऑफिसवाल्यांनी कडी लावलेली आहे. फ्लिपकार्टच्या ऑफिसमध्ये प्रवीण रमेश डिवरे (वय ३३) हे सहा वर्षांपासून मॅनेजर तर कंपनीचे टीम लीडर म्हणून रणजीतसिंग बिरसिंग पाटील हे काम करतात. या ऑफिसमध्ये बाहेरगावाहून ऑर्डर केलेल्या वस्तू ठेवून या ठिकाणाहून त्या संबंधितांकडे पोहोचविल्या जातात. गुरुवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास प्रवीण डिवरे हे काम आटोपून घरी निघून गेले. यावेळी टीम लिडर रणजीतसिंग पाटील व इरशाद शेख हे दोघ होते. ते रात्री ९.३० वाजता ऑफिस बंद करून निघून गेले.

कर्मचाऱ्याने दिली चोरी झाल्याची माहिती

ऑफिसमधून सामान रिकामा करणारा शांताराम वसंत शिंदे शुक्रवारी सकाळी ६.१० वाजेच्या सुमारास ऑफिसमध्ये आला. त्यावेळी त्याला ऑफिसमधील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. तसेच सामाईक भिंतीवरील दरवाजा व बंद असलेल्या गाळ्याचे कुलूप तुटलेले दिसल्याने शिंदे यांनी तात्काळ कंपनीचे मॅनेजर प्रवीण डिवरे यांना घटनेची माहिती दिली.

टेहाळणीनंतर केली चोरी

चोरट्याने गुरुवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास ऑफिसच्या परिसराची टेहाळणी केली. त्यानंतर चोरट्याने रात्री १२ वाजेच्या सुमारास ऑफिसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सव्वादोन वाजता तो चोरटा चोरलेले साहित्य घेवून बाहेर पडला. ही सर्व घटना ऑफिसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चोरट्याने ऑफिसमधून वेगवेगळ्या कंपनीचे सुमारे २ लाख ९९ हजार ४२४ रुपये किमतीचे १८ मोबाईल लंपास केले असून उर्वरित सर्व साहित्य याठिकाणी जसेच्या तसे पडलेले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: As many as 18 mobile lamps from Flipkart's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.