तब्बल ५७३ अहवाल प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 12:23 PM2020-05-23T12:23:21+5:302020-05-23T12:23:32+5:30

शहरातून घेतले आजपर्यंतचे सर्वाधिक ११९ जणांचे नमुने

As many as 573 reports are pending | तब्बल ५७३ अहवाल प्रलंबित

तब्बल ५७३ अहवाल प्रलंबित

Next

जळगाव : जिल्हाभरातील तब्बल ५७३ जणांचे कोरोना तपासणी अहवाल प्रलंबित आहेत़ यात जळगाव शहरातून सर्वाधिक ११९ जणांचे अहवाल तपासणीला पाठविण्यात आले आहे़ रात्री उशिरापर्यंत अहवाल प्राप्त झालेले नव्हते़ दरम्यान, शहरातील ओकांरनगर व ईश्वर कॉलनी येथील दोघांचे तपासणी अहवाल खासगी लॅबकडून पॉझिटीव्ह आलेले आहेत़
जिल्हाभरात शुक्रवारी ३०३ रुग्णांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे़ दरम्यान, २३ रुग्णांना बरे झाल्यानंतर शुक्रवारी घरी सोडण्यात आले़ यात अमळनेरातील तिघांचा समावेश असल्याने अमळनेरात आता केवळ चार रुग्ण उपचार घेत आहेत़
दरम्यान, शहराच्या चारही बाजूने आता कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढल्याने मोठीच चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:सोबतच कुटुंबाची काळजी घ्यावी आणि घाबरुन जावू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

शहरात जम्बो तपासणी
वाघनगरात एकाच कुटुंबातील १५ जण बाधित आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील लोकांची मोठ्या प्रमाणावर तपसणी केली जात आहे़ शुक्रवारी घेतलेल्या ११९ नमुन्यांमध्ये बाघनगरच्या संपर्कातील १५, शाहू नगरातील ३३, दक्षता नगर ५ अन्य बाधितांच्या संपर्कातील लोकांचे नमुने घेण्यात आले आहे़ दोन दिवसात हे अहवाल येणे अपेक्षित आहेत़

दोघे पॉझिटीव्ह
शुक्रवारी ओंकारनरातील एक पुरूष व ईश्वर कॉलनीतील एक ५२ वर्षीय प्रौढ यांचे तपासणी अहवाल खासगी लॅबकडून पॉझिटीव्ह आल्यनंती महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने या ठिकाणी उपाययोजना राबविल्या़ ईश्वर कॉलनीतील ९ लोकांना क्वारंटाईन करण्यात आले़ दरम्यान, ईश्वर कॉलनीतील बाधित रुग्ण विमा प्रतिनिधी असल्याचे समजते़

दोन बाधितांचा मृत्यू
एरंडोल व यावल येथील प्रत्येकी एक अशा दोन बाधितांचा शुक्रवारी मृत्यू झाला़ एरंडोल येथील ४५ वर्षीय प्रौढ रुग्णाला गुरूवारीच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते़ हा रुग्ण तीन दिवसांपासून कोरोना रुग्णालयात दाखल होता़ मृतांची संख्या आता ४६ वर गेलेली आहे़

Web Title: As many as 573 reports are pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.