जीवनात अनेक रुग्णांची सेवा आपल्या हातून झाली; ८० वर्षीय डॉक्टरांनी आयुष्य संपविले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 12:29 PM2023-08-15T12:29:29+5:302023-08-15T12:30:35+5:30

 डॉ. पाटील यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहली आहे. त्यात आपण स्वतंत्र दिनासारखा चांगला दिवस मृत्यूसाठी मुद्दामहून निवडत असल्याचे म्हटले आहे.

Many patients were served by us in life; An 80-year-old doctor ended his life | जीवनात अनेक रुग्णांची सेवा आपल्या हातून झाली; ८० वर्षीय डॉक्टरांनी आयुष्य संपविले

जीवनात अनेक रुग्णांची सेवा आपल्या हातून झाली; ८० वर्षीय डॉक्टरांनी आयुष्य संपविले

googlenewsNext

- विलास झवर 

पाळधी (जि.जळगाव) :  पाळधी (ता.धरणगाव ) येथील  डॉ, व्ही. आर. पाटील (८०) यांनी चोपडा तालुक्यातील निमगव्हाणनजीक तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी घडली, आपली चारचाकी गाडी पुलावर लावून त्यांनी पुलावरून थेट नदीत उडी घेतली. 

 डॉ. पाटील यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहली आहे. त्यात आपण स्वतंत्र दिनासारखा चांगला दिवस मृत्यूसाठी मुद्दामहून निवडत असल्याचे म्हटले आहे. जीवनात अनेक रुग्णांची सेवा आपल्या हातून झाली. त्यामुळे आता जीवन चांगल्या प्रकारे जगल्याचे त्यांनी चिठ्ठीत म्हटले आहे.

पुरोगामी चळवळीत सक्रीय असलेल्या डॉ. पाटील यांना शासनाचा दलित मित्र पुरस्कार मिळाला होता.

Web Title: Many patients were served by us in life; An 80-year-old doctor ended his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर