पूर्वीच्या निकषांवर अनेक खासगी कोविड रुग्णालये सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:17 AM2021-03-16T04:17:35+5:302021-03-16T04:17:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना अनेक खासगी रुग्णालयांनी कोविड हॉस्पिटलची परवानगी घेऊन सेवा सुरू केली ...

Many private covid hospitals started on earlier criteria | पूर्वीच्या निकषांवर अनेक खासगी कोविड रुग्णालये सुरू

पूर्वीच्या निकषांवर अनेक खासगी कोविड रुग्णालये सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना अनेक खासगी रुग्णालयांनी कोविड हॉस्पिटलची परवानगी घेऊन सेवा सुरू केली असून, पूर्वीच्या निकषांप्रमाणे शहरात १२ नव्या रुग्णालयांना ही परवानगी देण्यात आली आहे. यात शासनाने ठरवून दिलेले दरच कायम ठेवण्यात आलेले आहे. या खासगी रुग्णालयांमध्ये १०२९ बेडची व्यवस्था आहे.

जळगाव शहरातील खासगी रुग्णालयांना काहींना डेडिकेटेट कोविड हॉस्पिटल तर काहींना डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर म्हणून परवानगी देण्यात आली आहे. यात रुग्णालयांच्या क्षमतेनुसार कुठे दहा कुठे २० तर कुठे ६० पेक्षा अधिक बेड आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी शासनाने साधे बेड, अतिदक्षता विभागातील बेड, व्हेंटीलेटर्स अशा पातळ्यांवर विविध दर ठरवून दिले होते. त्यानुसारच रुग्णालयांनी आकरणी करण्याचे बंधनकारक होते. या जीआरनुसार अनेक रुग्णालयांनी अतिरिक्त शुल्क आकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर लेखापरिक्षकांडून लेखापरीक्षण करून अनेक रुग्णांना रुग्णालयांना रक्कम परत करावी लागली होती.

नवीन परवानगी दिलेले हॉस्पिटल

संवेदना हॉस्पिटल, द्वारका हॉस्पिटल, ॲक्सॉन ब्रेन हॉस्पिटल, मातोश्री हॉस्पिटल, निलकमल हॉस्पिटल, चिन्मय हॉस्पिटल, रुबी हॉस्पिटल, आधार क्रिअीकर केअर हॉस्पिटल, रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट, वेदांत हॉस्पिटल, मॅक्स क्रिटिकल केअर सेंटर, विजयेंद्र हास्पिटल

पूर्वीचे परवानगी दिलेले हॉस्पिटल्स

गोल्ड सिटी हॉस्पिटल, अरूश्री हॉस्पिटल, लोकसेवा हॉस्पिटल, गणपती हॉस्पिटल, सुविधा हॉस्पिटल, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, संजीवनी हॉस्पिटल, अश्विनी हाॅस्पिटल, अंजली हॉस्पिटल, मानस हॉस्पिटल, केवल हॉस्पिटल, श्री दत्त हॉस्पिटल, गुलाबराव देवकर जिल्हाधिकारी यांचे

औषधोपचारांवर प्रचंड खर्च

सद्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढला आहे. त्यात कुटुंबाचे कुटुंब बाधित येत असून, कोरोनात आवश्यक औषधींचा खर्च प्रचंड वाढल्याने ओपीडीतच रुग्णांना मोठा आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. त्यातच या संसर्गात पुन्हा सीटीस्कॅन करावा लागत असल्याने तो एक फटकाही रुग्णांना आता सोसावा लागत आहे.

कोट

पूर्वीच्या निकषानुसार आणि ३१ ऑगस्ट २०२० ला शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसारच खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आलेली आहे. आधीची जी पथके होती, ती सर्व कायम आहेत. कोणाची तक्रार आल्यानंतर त्यांचे त्या दृष्टीने लेखापरिक्षण केले जाईल. - डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक.

Web Title: Many private covid hospitals started on earlier criteria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.