जळगावात मराठा क्रांती मोर्चातर्फे आकाशवाणी चौकात पाऊण तास ‘रास्तारोको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 05:41 PM2018-07-29T17:41:06+5:302018-07-29T17:43:02+5:30

वाहतूक वळविल्याने कोंडी टळली

 Maratha Kranti Morcha organized the 'Rastaroko' | जळगावात मराठा क्रांती मोर्चातर्फे आकाशवाणी चौकात पाऊण तास ‘रास्तारोको’

जळगावात मराठा क्रांती मोर्चातर्फे आकाशवाणी चौकात पाऊण तास ‘रास्तारोको’

Next
ठळक मुद्दे मुख्यमंत्री आल्यास आजही आंदोलनाची तयारीकाकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली
<p>जळगाव: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चातर्फे आकाशवाणी चौकात सुमारे पाऊणतास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा आरक्षण आंदोलनात जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे या युवकाला चौकात मध्यभागी सभा घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे रविवारी दुपारी १२ वाजता आकाशवाणी चौकात विविध मराठा संघटनांना व समाजबांधवांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथील मराठा आंदोलकांबाबत केलेल्या गर्दीत साप सोडण्याच्या वादग्रस्त विधानाबाबत निषेध करून मनपा निवडणुकीच्या प्रचारासाठी जळगाव दौºयावर येणाºया मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशाराही मराठा क्रांती मोर्चाने दिला होता. मात्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवररविवारचामुख्यमंत्र्यांचा दौराच रद्द झाल्याने मराठा संघटनांनी आकाशवाणी चौकात रास्ता रोको करून, मराठा आरक्षणासाठी हौतात्म्य पत्करलेल्या काकासाहेब शिंदे या युवकाला श्रद्धांजलीही अर्पण केली.
१२.४० ला सुरू झाले आंदोलन
मराठा क्रांतीमोर्चातर्फे मुख्यमंत्र्यांच्या दौºयात गनिमी काव्याने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्या पा र्श्वभूमीवर सोशल मिडियावरून व फोनवरून जिल्हाभरातील मराठा समाजबांधवांना रविवार, २९ रोजी दुपारी १२ वाजता आकाशवाणी चौकात आंदोलनासाठी जमण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाभरातून मराठा समाजबांधव सकाळी १०.३० वाजेपासूनच या ठिकाणी जमण्यास प्रारंभ झाला. मात्र १२ वाजेच्या सुमारास डीवायएसपी सचिन सांगळे आंदोलनस्थळी आले. त्यांनी आंदोलन शांततेतकरण्याचेआवाहन केले. मराठा क्रांतीमोर्चाचे राज्यसमन्वयकसचिन सोमवंशी व अन्य पदाधिकाºयांनी अनुचित प्रकार होणार नाही, याची काळजी घेऊ असे सांगितले. त्यानंतर दुपारी १२.४० च्या सुमारास आकाशवाणी चौकाशेजारी वाहतूक पोलीस चौकीजवळ सर्व समाजबांधव जमून घोषणाबाजी सुरू झाली. यावेळी काही पदाधिकाºयांनी मार्गदर्शनही केले. तसेच आरक्षणाबाबत ‘कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’ ‘आरक्षण आमच हक्काच, नाही कुणाच्या बापाच’, ‘या सरकारच करायच काय खालती डोक वरती पाय’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘एक मराठा लाख मराठा’ ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्ची खाली करा’, तसेच विविध घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सचिन सोमवंशी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांमुळे समजल की साप सोडल्यावर काय होत ते. मराठा समाजाच्या जागा राखीव ठेवणार असले तरीही आता भरल्या जात असलेल्या ३६ हजार जागांमध्ये अर्ज भरायचा नाही, असे करू नका. डीवायएसपी सचिन सांगळे यांना सांगितले तुम्ही जा, अन्य अधिकाºयांवर सोपवून द्या. आम्ही कायदा हातात घेणार नाही. मुख्यमंत्री आले असते तर गुन्हे दाखल झाले असते तरी आंदोलन केले असते. मात्र मुख्यमंत्री घाबरले. दौरा रद्द केला. ते सोमवारी येणार असल्याचे सांगितले जात आहे. ते सोमवारी आले तर आपणही जमायचेच आहे. आपला गनिमी कावा दाखवून द्यायचा आहे. मराठा समाजाचे नेते नगरसेवकनरेंद्र पाटील यांचे निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यानंतर आपल्या गनिमीकावा जाहीर करू, असे सांगितले.
१२.५० ला रास्ता रोको सुरू
रस्त्याच्या कडेला बसून आंदोलन सुरू असताना दुपारी १२.५० वाजेच्या सुमारास आंदोलक उठून महामार्गावर आकाशवाणी चौकात आले. तेथे पूर्ण चौकात कडे करून मराठा समाजाच्या विविध संघटनांचे कार्यकर्ते उभे राहिले. तर पदाधिकारी व काही प्रमुख कार्यकर्ते चौकात मध्यभागी रस्त्यावर जमले. तेथेच खुर्चीवर काकासाहेब शिंदे यांची प्रतिमाही ठेवण्यात आली. या ठिकाणी मराठा समाजातील विविध संघटनांच्या पदाधिकाºयांनी मार्गदर्शन केले. यावेळी संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ यांनी ऐनवेळी निरोप देऊनही एवढ्या मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव जमले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दौराच रद्द केला. ही मराठा समाजाची ताकद आहे. मात्र गाफील राहता कामा नये. मुख्यमंत्री सोमवारी देखील येऊ शकतात. त्यामुळे सोमवारी याच्या १०० पट समाजबांधवांनी जमावे, असे आवाहन केले.
काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली
आकाशवाणी चौकात मध्यभागी रस्त्यावर खुर्ची ठेवून त्यावर काकासाहेब शिंदे यांची प्रतिमा ठेवण्यात आली. रस्त्यावरच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बसले. यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा श्ािंंदे, भीमराव मराठे, अ‍ॅड.सचिन पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर दोन मिनिट स्तब्ध राहून काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी आकाशवाणी चौकात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता. आंदोलनात सुरेंद्र पाटील, राजेश पाटील, किरण बच्छाव, योगेश पाटील, सुरेश पाटील, देवेंद्र मराठे, कल्पना पाटील, योगेश देसले यांच्यासह पदाधिकारी, मराठा समाजबांधव सहभागी झाले होते.

Web Title:  Maratha Kranti Morcha organized the 'Rastaroko'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.